सावधान ! Online च्या जाळ्यात फसू नका, उत्पादन (प्रोडक्ट) ‘असली’ की ‘नकली’ ओळखा ‘या’ पध्दतीनं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एकदा भारतात कोरोना व्हायरस प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यामुळे लोकांना घरात बसणे बंधनकारक होत आहे. त्यामुळे अनेकदा ऑनलाइन शॉपिंगवर अवलंबून राहावे लागत आहे. करोना व्हायरस वाढत असल्याने अनेक जण ऑनलाइन शॉपिंग करीत आहेत. Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्या प्रत्येक कॅटेगरीतील प्रोडक्ट्सर आकर्षक डिल्स उपलब्ध करीत आहेत. तुम्हाला अनेकदा सोशल मीडियावर ऑफर्सची लिंक आली असेल. परंतु, ती लिंक खरी की खोटी किंवा तुम्हाला जे प्रोडक्ट खरेदी करायचे आहे ते खरे की खोटे हे ओळखता येऊ शकते. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना याची खातरजमा करायला हवी.

अनकेदा काही लोक नकली प्रोडक्ट्सच्या फ्रॉडला बळी पडत आहेत. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, अखेर युजर्संनी खरे प्रोडक्ट कसे ओळखावे. जबरदस्त डिल्स उपलब्ध करीत असलेले प्रोडक्ट्स नकली आहे की खरे हे तपासणे आपले काम आहे. यासंबंधी काही खास टिप्स…

आता ॲप करणार मदत
फूड रेगुलेटर FSSAI के Smart Consumer ॲपच्या मदतीने प्रोडक्ट खरे की खोटे हे ओळखता येऊ शकते. या ॲपमध्ये प्रोडक्टचे QR नंबर एन्टर करावे लागते. त्यानंतर या प्रोडक्टची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. याशिवाय, कंपनी इलेक्ट्रॉनिक किंवा FMCG, नकली प्रोडक्ट पासून वाचण्यासाठी एक QR कोड आणि होलोग्रामचा वापर करते. यावरून प्रोडक्टची ओळख केली जाऊ शकते.

मॅन्यूफॅक्चरिंग आणि ब्रँडिंग
कोणत्याही प्रोडक्टची ओळख त्याच्या लोगा आणि स्पेलिंगवरून केली जाऊ शकते. कोणी कितीही लोगो आणि स्पेलिंग एकसारखी बनवली असली तरी काहीतरी वेगळे ठेवावेच लागते. त्यामुळे काही लोकांचे ब्रँडचा लोगो वेगळा होतो. केवळ हेच नाही तर ब्रँडच्या नावात स्पेलिंगची चूक प्लेसिंग नकली प्रोडक्टमध्ये केली जाते. त्यामुळे प्रोडक्ट खरेदी केल्यास त्याचा लोगो आणि स्पेलिंग चेक करा.

जास्त डिस्काउंटच्या प्रोडक्ट चांगले तपासून पाहा
जर कोणत्याही प्रोडक्ट्सवर जास्त डिस्काउंट दिला जात असेल तर त्याला खरेदी करण्याआधी त्याचा फिजिकली ॲड्रेस, ईमेल, फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल चेक करा. ऑनलाइन शॉपिंग करताना जास्त डिस्काउंटच्या प्रेमात पडू नका. कोणत्याही ब्रँडेड आयटम, लग्झरी प्रोडक्टची एमआरपी वर ७० ते ८० टक्के पर्यंत डिस्काउंट दिला जाऊ शकत नाही. जर असे असेल तर ते प्रोडक्ट नकली आहे.

प्रोडक्टच्या वेबसाइटवर ध्यान द्या
फेक वेबसाइट बनवणे आता काही अवघड काम राहिले नाही. अनेकदा लोक WhatsApp किंवा अन्य मेसेजिंग ॲपवरून Flipkart किंवा Amazon वर मोठा डिस्काउंटचे मेसेज फॉरवर्ड करीत असतात. यात अनेक जण अडकत असतात. या ठिकाणी वेबसाइटची लिंक सु्द्धा दिली जाते. लिंकवरून वेबसाइट खरी की खोटी याची माहिती मिळू शकते. जर वेबसाइट फेक असेल तर प्रोडक्ट सुद्धा फेक आहे. याच्या URL वर खास लक्ष द्या. जर खरी वेबसाइट असेल तर https ने सुरुवात होते. अन्यथा http ने याची सुरुवात होते.