कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहाल सुरक्षित? तज्ज्ञांचा सल्ला – ‘बचावासाठी आतापासूनच सुरू करा ‘ही’ 9 कामे’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शास्त्रज्ञ तसेच औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की, कोविड-19 संकट अजून संपलेले नाही आणि जर महामारीची तिसरी लाट आली तर तिचे गंभीर परिणाम होतील. व्हायरसचा उच्च स्तरीय प्रसार पाहता तिसरी लाट येणे अनियावर्य आहे, परंतु हे स्पष्ट नाही की, ही तिसरी लाट केव्हा आणि कोणत्या स्तराची असेल. उच्च न्यायालयाने सुद्धा केंद्र सरकारला यास तोंड देण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचण्याचे उपाय
1- सीएसआयआरने म्हटले की, भारत सध्या सामुदायिक प्रतिकारशक्ती मिळवण्यापासून दूर आहे. अशावेळी लोकांनी व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क घातला पाहिजे. तसेच सामाजिक अंतर, हातांची स्वच्छता अशा उपायांचे पालन केले पाहिजे.
2- हात नियमितपणे साबणाने धुणे आवश्यक आहे.
3- शक्यतो घराच्या बाहेरच पडू नका आणि जात असाल तर मास्क घाला, सोबत सॅनिटायजर ठेवा.
4- मास्क आणि कोणत्याही वस्तूला स्पर्श करणे टाळा.
5- संक्रमित लोक आणि इतर लोकांपासून किमान एक मीटरचे अंतर राखा.
6- शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर योग्य ठिकाणी टाका.
7- आरोग्य अगोदरपासून खराब आहे तर घरातच रहा.
8- स्मोकिंग टाळा आणि फुफ्फुसाला प्रभावित करणार्‍या वस्तूंपासून दूर रहा.
9- कोरोना व्हायरसपासून वाचण्याची सर्वात सोपी पद्धत तर ही आहे की विनाकारण घरातून बाहेरच पडू नका.

मुलांसाठी धोकादायक तिसरा लाट अशी घ्या काळजी
* मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.
* डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित कालावधीपर्यंत मुलांना सप्लीमेंट देऊ शकता.
* त्यांना 15 दिवसांसाठी झिंक, एक महिन्यासाठी मल्टीव्हिटॅमिन आणि एक महिन्यासाठी कॅल्शियम दिले जाऊ शकते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढू शकते. मात्र, डॉक्टर व्हिटॅमिनच्या नैसर्गिक स्त्रोतांचा जास्त उपयोग करण्याचा सुद्धा सल्ला देत आहेत.
* कोरोना नियमांची मुलांना सवय करून द्या. लहान मुलांना बाहेरून आलेल्या लोकांपासून दूर ठेवा, जरी त्यांच्यात लक्षणे असतील किंवा नसतील. मुलांना सर्दी-तापाच्या आजारापासून वाचवा.
* कारण रोग प्रतिकारशक्तीचे नुकसान होते. यासाठी मुलांना जास्त थंड पाणी आणि तेलकट जेवण देऊ नका. आहारात डाळ, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.