प्रवासात उलटी येत असेल तर करा ‘हे’ उपाय ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – प्रवासात उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. यास मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेस हा आजार नसून एक अशी स्थिती आहे. प्रवासात कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात यामुळे नव्‍हर्स सिस्‍टीमचा गोंधळ उडतो. आणि चक्‍कर, मळमळ, उलटी होते. काही घरगुती उपाय केल्‍यास या त्रासापासून आराम मिळू शकतो.

प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने मोशन सिकनेसमुळे होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते. अ‍ॅप्‍पल साइडर व्हिनेगारमुळे शरीरातील क्षार व पीएच संतुलनावर प्रभाव पडतो. मोशन सिकनेस होत असल्‍यास एक कप कोमट पाण्‍यामध्‍ये एक चमचा अ‍ॅप्‍पल साइडर व्हिनेगार आणि एक चमचा मध मिसळून प्‍यायल्यास आराम मिळतो. तसेच पुदिन्‍यामुळे मोशन सिकनेसमध्ये ताबडतोब आराम मिळतो.

पुदिन्‍यातील मेथॉंलमुळे पोटातील मांसपेशी शांत होतात व मळमळ कमी होते. तसेच मोशन सिकनेसच्‍या समस्‍येला दूर करण्‍यासही पुदिना मदत करतो. ताजे लिंबू किंवा लिंबाच्‍या रसामध्‍ये सा‍यटिड्ढक अ‍ॅसिड असते. यामुळे प्रवासादरम्‍यान होणारी उल्‍टी, मोशन सिकनेस आणि पोटासंबंधीचा त्रास कमी होतो. एवढेच नव्‍हे तर लिंबाचा केवळ वास घेतल्‍यानेही या मोशन सिकनेसपासून आराम मिळू शकतो. खारे क्रॅकर्स हा एक सहज पचणारा नाष्‍टा आहे. पोटासाठीदेखील तो चांगला असून हे चवदार खाद्यपदार्थ पोटातील अतिरिक्‍त अ‍ॅसिड शोषून घेतात. यामुळे मोशन सिकनेसपासून आराम मिळतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/