How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Care Heart In Summers | जसजसे तापमान वाढू लागते, तसतसे आपले शरीराचेही कार्य वाढते. बाहेरच्या तापमानात शरीराचे तापमान थंड ठेवण्याच्या कामात हृदयाचे मोठे योगदान असते. हृदयालाही रक्त वेगाने पंपिंग करावे लागते. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होऊन शरीराचे तापमान थंड राहते. जर शरीराचे तापमान थंड नसेल तर उष्माघात होऊ शकतो (How To Care Heart In Summers). या ऋतूत हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागत असल्याने, मग ज्या लोकांना आधीच हृदयरोग आहे, त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा (Heart Attack, Stroke) प्रचंड धोका असतो.

 

हृद्यरुग्णांनी उन्हाळ्यात या गोष्टींची काळजी घ्यावी. (Heart Patients Should Take Care Of These Things In Summer)

भरपूर पाणी प्या (Drink Plenty Water) :
अनेक हृदयरोगींना पाण्याचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो, परंतु, उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे फायद्याचे ठरते, कारण यामुळे शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. पुरेसे पाणी पिण्यामुळे हृदयाची गती नियंत्रित होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

 

संतुलित आहार घ्या (Eat Balanced Diet) :
आपल्या आहारात सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, डाळी आणि शेंगा खाव्यात. जंक, तळलेले, तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

 

व्यायामाचे प्रमाण कमी हवे (Exercise Should Be Reduced) :
उन्हाळ्याच्या मोसमात शरीराचं तापमान जास्त असते. अधिक व्यायाम केल्यास, आपल्या हृदयाला वेगाने रक्त पंप करावे लागेल. वर्कआउट इनडोअर किंवा जिममध्ये करणे आणि विशेषतः सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतची वेळ टाळणे चांगले आहे, कारण ही वेळ सर्वात जास्त गरम आहे.

कॅफिन आणि अल्कोहोलपासून दूर रहा (Stay Away From Caffeine And Alcohol) :
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असते. जे हृदयाचे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची कमतरता असणे धोकादायक असते. उष्णतेत प्रत्येकाने भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून शरीराला योग्य तापमान राखण्यास मदत होईल. कॉफी, चहा, दारूमुळे पाण्याची कमतरता निर्माण होते. त्याऐवजी ताजा रस, नारळपाणी, ताक अशा गोष्टींचं सेवन करा (How To Care Heart In Summers).

 

वेळोवेळी तपासणी आवश्यक (Checkup Requires) :
हृदयरुग्णांनी तरी वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. विशेषत: उन्हाळ्यात हृदयावर अतिरिक्त दबाव येत असल्याने चेकअप आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- How To Care Heart In Summers | how to take care of your health during hot weather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms Of Depression In Women | महिलांमधील ‘हे’ आहेत डिप्रेशनची लक्षणे; जराही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

 

Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

 

Egg Combinations Are Dangerous | अंड्यासोबत ‘हे’ कॉम्बिनेशन शरीरासाठी धोकादायक; ‘या’ 5 गोष्टी कधीही खाऊ नका