दहावी आणि बारावीनंतर सैन्यात कोणत्या पदावर नोकरी मिळू शकते ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक तरुण सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पहात (Carrier in Indian Army) असतात. सैनिक या देशातील सर्वात श्रेष्ठ, सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे. तरुणांना सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असते. परंतु सैन्यात कसं भरती व्हायचं, कोणत्या दलात सहभागी व्हायचं, त्यासाठी शिक्षणाची अट काय आहे. असे अनेक प्रश्न तरुणांना पडतात. सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना 10 वी, 12 वी आणि ग्रॅज्युएशनंतर सैन्य दलात भरती होता येते. सैन्य दलात कोणकोणत्या पदासाठी अर्ज दाखल करता येतो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

NDA किंवा NA
जर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) किंवा नौदल अकादमीत (NA) अर्ज करु शकता. याची परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून वर्षातून दोनवेळा घेतली जाते. त्यापैकी पहिली परीक्षा ही एप्रिल- मे महिन्यात होते. तर दुसरी परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केली जाते. या परीक्षेत निवड होणाऱ्यांना नौदल, लष्कर आणि वायू दलात लेफ्टनंट बनवले जाते.

IAF Gruoup X And Y Recruitment 2021
भारतीय वायू दलात X आणि Y पदाच्या भरती आयोजित केल्या जातात. यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात. यावर्षी 22 जानेवारीपासून या पदांसाठी भरती निघणार आहे.

FAFCAT Recruitment
बऱ्याच जणांना वायू दलात करीअर करण्याची इच्छा असते. वायू दलाकडून कॉमन अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. या परीक्षेसाठी कला आणि विज्ञान शाखेतून 12 वी पास झालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. परंतु, या परीक्षेसाठी वयाची अट असते. ही परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 16 ते 19 या वयोगटात असणे आवश्यक आहे.

Indian Army Recruitment Rally
सैन्य दलात भरतीसाठी देशभरात विविध राज्यांमध्ये रॅली आयोजित करण्यात येते. या रॅली अंतर्गत भारतीय सैन्यात सैनिक पदावर भरती केली जाते. यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 16 ते 21 असणे आवश्यक आहे.

SSC GD Recruitment
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ही भरती केली जाते. यासाठी उमेदवार 12 पास असणे आवश्यक आहे. बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी जीडी कॉन्स्टेबल पदासाठी भरती आयोजित केली जाते. या परीक्षेतून BSF, भारत-तिबेट सीमा पोलीस, सीआरपीएफ, आसाम रायफल्स, सीआएसएफमध्ये जीडी कॉन्स्टेबल पदासाठी भरती केली जाते. या पदासाठी देखील लवकरच नोटीफिकेशन जारी केले जाणार आहे.

ग्रॅज्युएशननंतर कसा कराल अर्ज ?
पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला सैन्य दलात करिअर करायचे असेल तर तुम्हाला या पदासाठी उत्तम संधी आहे. CDS पदासाठी उमेदवाराला प्रिलियम्स परीक्षा, त्यानंतर मेंस, फिजिकल आणि मेडिकल टेस्ट, जीडी आणि डॉक्यूमेंट्री वेरिफिकेशन या सर्वांना सामोरं जावं लागतं. या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारालाच या पदाची नोकरी मिळते. या पदासाठी उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर पदांसाठी देखील उमेदवार अर्ज करु शकतात.