LPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती एलपीजी ग्राहकांना LPG Customer मोदी सरकार एक मोठा दिलासा देणार आहे. आता ग्राहक स्वताच हे ठरवू शकतात की, त्यांना कोणत्या डिस्ट्रीब्यूटरकडून Distributor गॅस रिफिल करायचा आहे. या सुविधेला रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी Refill Booking Portability नाव दिले आहे. देशातील निवडक शहरात पायलट प्रोजेक्ट म्हणून पुढील आठवड्यात ही सुविधा सुरू होऊ शकते. सरकारने यासाठी चंदीगढ, कोईम्बतून, गुडगाव, पुणे आणि रांची या शहरांची निवड केली आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर ही योजना हळुहळु सर्व शकरात लाँच केली जाईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ही योजना शहरात लागू झाल्यानंतर नवीन सिलेंडर बुक केला तर तुमच्याकडे डिस्ट्रीब्यूटर निवडण्याचा पर्याय सुद्धा असेल. तुमच्या भागातील जेवढे डिस्ट्रीब्यूटर आहेत, त्यांची यादी दिसेल, त्यामधून चांगला डिस्ट्रीब्युटर निवडू शकता. यासाठी सिलेंडर, रेग्युलेटर जमा करण्याची तसेच शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

Imran Khan । इम्रान खान यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘बलात्कारासाठी महिलांचे कपडे जबाबदार’

डिस्ट्रीब्यूटर निवडण्याची प्रक्रिया
www.mylpg.in वेबसाइटवर जाऊन आपल्या LPG आयडीद्वारे LPG ID लॉगिन करा.
– अगोदर रजिस्टर्ड नसल्यास रजिस्ट्रेशन करावे लागेल.
– येथे विभागवार डिस्ट्रीब्यूटरची माहिती मिळेल.
– प्रत्येक डिस्ट्रीब्यूटरच्या पुढे त्याचे रेटिंग असेल, ते पाहून डिस्ट्रीब्यूटर निवडू शकता.
– यानंतर मेलवर कन्फर्मेशनसाठी एक फॉर्म पाठवला जाईल.
– तुम्ही डिस्ट्रीब्यूटर बदलत असल्याची माहिती सध्याच्या डिस्ट्रीब्यूटरला पाठवली जाईल.
– सध्याचा डिस्ट्रीब्यूटर तीन दिवसात फोन करून डिस्ट्रीब्यूटर Distributor न बदण्यासाठी विनंती करू शकतो.
– सध्याच्या डिस्ट्रीब्यूटरसोबत कायम राहणार असाल तर डिस्ट्रीब्यूटरकडे तुमची रिक्वेस्ट कॅन्सल करण्याचे ऑपशन असेल.
– जर डिस्ट्रीब्यूटर बदलायचा असेल तर तसे सांगावे लागेल, ताबडतोब तुमचे कनेक्शन नवीन डिस्ट्रीब्यूटरकडे ट्रान्सफर होईल.
– जर सध्याच्या डिस्ट्रीब्यूटरने 3 दिवसात कनेक्शन ट्रान्सफर केले नाही तर चौथ्या दिवशी आपोआप कनेक्शन ट्रान्सफर होईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : how to change lpg distributor online how to transfer lpg connection online

हे देखील वाचा

MP Arvind Sawant । शिवसेनेचा राज ठाकरेंवर पलटवार; म्हणाले – ‘बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं’

भाजपचा पलटवार, म्हणाले – ‘कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन CM ठाकरेंना सूचवा’