कामाची गोष्ट ! तुमचं ‘आधार’कार्ड ‘कुठं-कुठं’ वापरलं गेलं, घर बसल्या ‘असं’ तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज आधार कार्ड अत्यंत महत्वाचे झाले आहे. कारण सरकारी कामात आधार कार्ड महत्वाचे झाले आहे. अनेकदा आधारच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. आधार कार्डवरील माहिती चोरल्याचे प्रकार देखील घडतात. आधार कार्ड संबंधित अनेक फसवणूकीच्या घटना समोर आल्या आहेत. परंतू आता तुम्ही देखील जाणून घेऊ शकतात की तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे करण्यात आला आहे.

तुमच्या आधार कार्डची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी यूआयडीएआयच्या आधिकृत वेबसाइटवर https://uidai.gov.in/ भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला आधार ऑथिंटिकेशन हिस्ट्रीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला माय आधार सेक्शनवर जावे लागेल. याशिवाय तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history वर क्लिक करावे लागेल. त्यात तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. 12 आकडी आधार नंबर एंटर करुन तुम्हाला सिक्युरिटी कॅप्चा टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल. हा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल.

ओटीपी एंटर केल्यानंतर आधार कार्डवरील संपूर्ण माहिती भरावी लागेल. यानंतर तुम्हाला जी माहिती मिळेल ती मागील 6 महिन्यांपूर्वी झालेल्या वापराची आहे.

भारत सरकारने आधार कार्डसंबंधित एक महत्वाचा निर्णय घेतला की ज्या अंतर्गत लोक आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जास्त कागदपत्र लागू शकतात. तुम्हाला नाव आणि पत्ता बदलण्यासाठी ओळख पत्र, वाहन परवाना आणि शिक्षण संस्थेचे लेटर यापैकी एका कागदपत्राचा वापर करता येईल.

Visit : Policenama.com