‘Block’ नंबर वरुन केव्हा आला ‘कॉल’, ‘मेसेज’, जाणून घेण्याची ‘ही’ आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा आपल्याला नको असल्याचे फोन नंबर ब्लॉक करतो. यानंतर ब्लॉक केलेल्या व्यक्तीचे फोन, मेसेज तुम्हाला येणार नाहीत. परंतू तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की ब्लॉक केलेल्या कोणी कोणी तुम्हाला कॉल केले तर हे तपासण्याची ही एक पद्धत आहे.
ही पद्धत प्रत्येक मोबाइलमध्ये वेगळी असते. उदाहरण म्हणून रेडमीच्या मोबाइलचा विचार केल्यास, तुम्हाला सर्वात आधी Security App मध्ये जावे लागेल.

त्यानंतर ब्लॉकलिस्टच्या पर्यायावर क्लिक करा, येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील. call आणि SMS चा. आता कॉलवर किल्क केल्यास तुम्हाला त्याचे कॉल दिसतील त्यांना तुम्ही ब्लॉक केले आहे. SMS वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यांनी ज्यांनी SMS केले आहेत त्यांची यादी दिेसेल.

याशिवाय तुम्ही जर एखादा नंबर ब्लॉक करु इच्छितात, तर तुम्हाला याच सेक्युरिटी अ‍ॅपमध्ये जावे लागेल. त्यावर Block List वर क्लिक करावे लागेल, यात खाली Add बरोबरच प्लस + चे चिन्ह दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर त्यात block करायचा असलेला नंबर टाकू शकतात. यानंतर हा नंबर ब्लॉक होईल.

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा नंबर ब्लॉक करतात तेव्हा एखादा ब्लॉक केलेला व्यक्ती तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करेल तर इतर नोटिफिकेशन सारखे त्याचे ही नोटिफिकेशन तुम्हाला येईल. यासह ब्लॉक नंबरवरुन तुम्हाला किती वेळा कॉल आला त्याची महिती देखील मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –