EPFO : तुमच्या खात्यात सुद्धा आले का PF चे पैसे, घरबसल्या केवळ एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या बॅलन्स
नवी दिल्ली : तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स घरबसल्या चेक करायचा असेल तर ईपीएफओने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याच्या अनेक पद्धती आहेत. यामध्ये एक पद्धत आहे मिस कॉलसाठी ईपीएफओने नंबर जारी केला आहे. याशिवाय ऑनलाइन किंवा एसएमएसने सुद्धा तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेवू शकता.
1. मिस्ड कॉलसाठी या नंबरवर करा कॉल
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
2. एसएमएसच्या द्वारे
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
3. उमंग अॅपद्वारे
प्ले स्टोर वरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हिस निवडा. आता युएएन नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता.
4. वेबसाइटद्वारे
तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता. यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.