आता करावी लागणार नाही स्टेशनवर ट्रेनची प्रतिक्षा, घरबसल्या WhatsApp वर चेक करा ‘लाइव्ह रनिंग स्टेटस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही ट्रेनने कुठे प्रवास करण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला आपल्या ट्रेनेचे लाइव्ह रनिंग स्टेटस खुपच सहजपणे समजू शकते. तुम्ही घरबसल्या व्हॉट्सअपद्वारे (WhatsApp ) ही माहिती घेऊ शकता की, तुमची ट्रेन कुठपर्यंत पोहचली आहे आणि किती लेट धावत आहे. याशिवाय तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पीएनआर स्टेटससुद्धा चेक करू शकता. हिवाळ्याच्या दिवसात प्रवाशांना ट्रेन लेट झाल्याने स्टेशनवर मोठी प्रतिक्षा करावी लागते. पण आता या टेंशनपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. ट्रेनचे स्टेटस कसे चेक करायचे ते जाणून घेवूयात.

Railofy च्या द्वारे व्हॉट्सअवर मिळेल माहिती
* सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये Railofy चा व्हॉटअप नंबर (+91-9881193322) सेव्ह करा.
* यानंतर व्हॉट्सअप ओपन करून Railofy च्या नंबरवर टॅप करून विंडो आपेन करा.
* चॅट विंडोमध्ये आपला 10 डिजिटचा PNR नंबर टाइप करून Railofy च्या नंबरवर पाठवा.
* यानंतर Railofy, PNR नंबरवर नोंदवलेल्या ट्रेनच्या रनिंग स्टेटसबाबत आपल्याला माहिती देत राहील.

Make My Trip च्याद्वारे व्हॉट्सअपवर मिळेल माहिती
* यासाठी सर्वप्रथम मेक माय ट्रीपचा व्हॉट्सअप नंबर (+91-7349389104) आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.
* यानंतर व्हॉट्सअप ओपन करून मेक माय ट्रीपच्या नंबरवर टॅप करून चॅट विंडो ओपन करा.
* चॅट विंडोमध्ये आपला 10 डिजीटचा PNR नंबर टाइप करून मेक माय ट्रीपच्या नंबरवर पाठवा.
* यानंतर मेक माय ट्रीप, पीएपआर नंबरवर नोंदवलेल्या ट्रेनच्या रनिंग स्टेटस बाबत तुम्हाला माहिती देत राहील.