नवीन मोबाइल फोन खरेदी करण्यापूर्वी आवश्य तपासा ‘या’ गोष्टी, समजू शकते फोन ‘खरा’ आहे की ‘बनावट’

नवी दिल्ली : सध्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर रिफर्बिश्ड मोबाइल फोन खरेदी करण्याचा कल वाढत आहे. हा वाढता ट्रेंड पाहता तुम्ही सुद्धा रिफर्बिश्ड मोबाइल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी ठरवली पाहिजे. फोन खरेदी करताना तो तपासून घेतला पाहिजे. जो फोन आपण खरेदी करत आहोत तो चोरीचा तर नाही ना, असा फोन खरेदी करणे महागात पडू शकते.

भारत सरकारने रिफर्बिश्ड मोबाइल फोन खरेदी करणार्‍यांचे काम सोपे केले आहे. आता ते सहज जाणून घेऊ शकतात की, आपण खरेदी करत असलेला फोन योग्य आहे किंवा नाही. नुकतेच भारत सरकारने, सेंट्रल एक्विपमेंट आयडेंडिटी रजिस्टर नावाचा एक प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. Central equipment identity register, ईएमईआय नंबरद्वारे फोन खरेदी करणे योग्य आहे किंवा नाही हे समजते.

भारतात सर्व मोबाइल फोन, एक 15 डीजीट ईएमईआय नंबरद्वारे विकणे बंधनकारक आहे. या नंबर शिवाय भारतात कोणताही फोन विकणे बेकायदेशीर मानले जाते. आपल्या मोबाइल फोनचा ईएमईआय नंबर जाणून घेण्यासाठी आपल्या फोनमध्ये *#06# वर डायल करा.

या नंबरवर डायल करताच तुमच्या स्क्रीनवर तुमचा ईएमईआय नंबर दिसू लागेल. जर तुमचा मोबाइल फोन हा नंबर डायल केल्यानंतर कोणतेही उत्तर देत नसेल तर तुमचा फोन नक्कीच बेकादेशीर प्रकारे विकला गेला आहे.

इनव्हाइससुद्धा आहे आवश्यक
याशिवाय तुम्ही तुमच्या मोबाइल फोनचा ईएमईआय नंबर तुमच्या मोबाइलचे बिल किंवा इनव्हाइसवर सुद्धा पाहू शकता. तुम्ही ज्या व्यक्तीकडून फोन खरेदी करता, बदल्यात या मोबाईल बिलाची किंवा इनव्हाइसची मागणी करा. जर तो व्यक्ती तुम्हाला बिल देत नसेल तर भारत सरकार तुम्हाला अशा प्रकारचा फोन खरेदी करण्याची परवानगी देत नाही.