पंतप्रधान आवास योजनेत (PMAY) तुमचं नाव कसं तपासायचं, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने 2022 पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान आवास योजनेची (पीएमएवाय) सुरूवात केली आहे. या स्कीमअंतर्गत सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पीएमएवाय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे. ही योजना शहरी आणि ग्रामीण लोकांसाठी बनवण्यात आली आहे. कमी उत्पन्न असणारे लोक इडब्ल्यूएस आणि एलआयजी ग्रुपना मिळणारी ही क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम आहे. यामध्ये आपल्याला होम लोनवर व्याजदरात सबसिडी मिळते.

ही योजना पूर्ण देशात लोकप्रीय होत असल्याचा दावा केला जात आहे. योजनेची सर्वात विशेष बाब म्हणजे सरकारकडून देण्यात येणारी अडीच लाखांची सबसीडी ही प्रोत्साहनाचे काम करते.

ज्या लोकांचे उत्पन्न वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते इडब्ल्यू कॅटेगरीत येतात. 6 लाख रूपये वार्षिक कमावणारे लोक एलआयजीमध्ये येतात. या दोन्ही कॅटेगरीत पीएमएवायअंतर्गत 6 लाख रुपयांपर्यंतच्या लोनवर 6.5 टक्केपर्यंत व्याज सबसिडीचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे 18 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे ते हौसिंग फॉर ऑल बाय 2022 स्कीम अंतर्गत अप्लाय करू शकतात.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ट्विटनुसार पीएमएवाय ग्रामीणमध्ये एकुण 1.14 कोटी घरांपैकी बहुतांश महिलांच्या नावाने आहेत. सुमारे 67 टक्के घरे महिलांच्या नावाने आहेत किंवा संयुक्त नावाने आहेत.

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) शहरी आणि ग्रामीण दोन प्रकारची लीस्ट असते.

1 – पीएमएवाय शहरी लिस्ट

यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला https://pmaymis.gov.in वर व्हिजिट करावे लागेल. किंवा या लिंकवर क्लिक करा https://pmaymis.gov.in/Open/Find_Beneficiary_Details.aspx

यानंतर Search Beneficiary वर क्लिक करा. याचे पुढील पेज ओपन होईल. यामध्ये Search by Name वर क्लिक करा.

ज्यामुळे पुढील पेज ओपन होईल. यानंतर आधार नंबर टाकून सबमिट करा. आवश्यक माहिती सबमिट केल्यानंतर स्टेटससह तुम्हाला पीएमएवाय अर्जाचे पूर्ण स्टेटस दिसेल.

2 – पीएमएवाय ग्रामीण

या लिस्टमध्ये कसे चेक कराल नाव

पंतप्रधान आवास योजनेत ग्रमीण लिस्टमध्ये आपले नाव सर्च करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपले Registration ID नोंद करून स्टेटस चेक करा.
https://rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx

जर तुमच्याकडे Registration नंबर नसेल तर PMAY-Gramin च्या ऑफिशियल वेबसाइटवर अशी माहिती घ्या.

https://rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx आपल्या ब्राऊजरवर ही लिंक अ‍ॅक्सेस करा.

पुढील पेजवर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, पंचायत, स्कीमचे नााव आणि अन्य डिटेल्स सिलेक्ट कराव्या लागतील. सबमिटनंतर तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल, बँक डिटेल्स, घराच्या डिटेल, मंजूरी आणि सर्व माहिती तुम्हाला दिसेल.