Health Care : जाणून घ्या कान स्वच्छ करण्याची पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन – कानात मळ होणे हे खूप सामान्य आहे. आपल्या सर्वांमध्ये हे घडते आणि वेळोवेळी ते स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे. आपण वेळोवेळी कान साफ न केल्यास कान दुखणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बहिरापणासारख्या समस्या उद्भवू शकतात. कान साफ कसे करावे, हे जाणून घ्या

१) गरम पाणी
पाणी कोमट करून ते कापसाच्या मदतीने कानात टाका. कान थोडा वेळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा. कान स्वच्छ करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे.

२) तेल
ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून गरम करा. आता हे तेल कोमट झाल्यावर ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून थोड्यावेळ तसेच ठेवा. असे केल्याने कानातील मळ थोड्यावेळात सहजतेने बाहेर येईल.

३) कांद्याचा रस
थोडा गरम करून कांद्याचा रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंब कानात घाला. हे कानातून घाण सहजपणे बाहेर काढेल.

४) मीठ आणि पाणी
गरम पाण्यात मीठ मिसळून एकजीव करून घ्या. आता काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलटा करून पाणी काढून टाका. परंतु हे लक्षात ठेवा की कान दुखणे किंवा खरचटने आणि जखमा झाल्यास ही पद्धत अवलंबू नका.