पोलीसनामा ऑनलाइन टीम – नोकरदारांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना त्या-त्या कंपनीच्या नियमांनुसार नवे सॅलरी अकाऊंट उघडावे लागतात. प्रत्येकवेळी नवे खाते उघडल्यानंतर जुने खाते निष्क्रिय होऊन जातं. ते निष्क्रिय झालेले खाते हे बंद करण्याऐवजी तसेच पडून राहते. झीरो बॅलन्स अकाउंटमध्ये काही महिने त्यात पगार पडला नाही तर त्या अकाउंटचं रूपांतर बचत खात्यात होतं. पण अनेकदा त्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागतेच. ते शक्य होत नसेल तर तुम्ही ते अकाउंट बंद केलेलंच योग्य ठरतं. कारण निष्क्रिय झालेल्या खात्याचा आपल्याला कुठला फायदा होत नसला, तरी त्याचे अनेक नुकसान आपल्याला भोगावं लागू शकतं. बँक अकाउंट बंद करताना खालील काळजी घ्या –
1) तुम्हाला तुमचं खातं बंद करायचं असेल तर बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन अकाउंट क्लोजर फाॅर्म भरावा लागेल. या फाॅर्मबरोबर डी-लिंकिंग फाॅर्मही सबमिट करावा लागेल. तुमच्याकडे असलेलं चेक बुक, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जमा करावे लागेल.
2) तुमच्या अकाउंटला लिंक असलेल्या सर्व डेबिट लिंक्स बंद करून घ्या. अनेकदा EMI, फोन बिल, वीज बिल डेबिट होतं. नवा अकाउंट नंबर आपल्या कर्जदात्यांना द्या.
3) तुम्ही जुनं सॅलरी अकाउंट बंद करणार असाल तर तुमच्या एम्पलाॅयरला नवे अकाउंट डिटेल्स द्या. ज्या अकाउंटला तुम्ही बंद करणार असाल त्यात निवृत्तीनंतर पेंशन पडणार असेल तर सरकारी एम्प्लाॅयरला त्याबाबत माहिती द्या.
4) तुम्ही बचत खातं उघडल्यानंतर 14 दिवसाआधी बंद केलं तर त्याला शुल्क आकारले जात नाही. पण त्यानंतर एक वर्षाच्या आधी बंद केलं तर त्याला शुल्क आकारतात. पण वर्षानं अकाउंट बंद केलं तर कुठलंच शुल्क आकारले जात नाही.
Visit :- policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा