How To Control Blood Sugar | ब्लड शुगर लेव्हल करायची असेल कंट्रोल तर ‘या’ Fruits चे करा सेवन; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Control Blood Sugar | जगभरात ब्लड शुगरच्या रुग्णांची (Blood Sugar Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. वेळीच काळजी न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी बहुतेकजण खाण्यापिण्याची काळजी घेण्यास विसरतात. जर वेळेवर सकस आहार (Healthy Diet) घेतला तर स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त (Healthy And Fit) ठेवू शकता (How To Control Blood Sugar).

 

निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार (Nutritious Diet) महत्त्वाचा मानला जातो. इन्सुलिन (Insulin) हे स्वादुपिंडाद्वारे तयार होणारे हार्मोन आहे. जे अन्नातून व्यक्तीच्या पेशींमध्ये ग्लुकोज (Glucose) नेण्यास मदत करते. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्याने मधुमेह (Diabetes) आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी काणेत्या फळांचा आहारात समावेश करावा ते जाणून घेवूयात (Let’s Know Which Fruits Should Be Include In Your Diet To Control Blood Sugar Level)…

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा ही फळे (Eat These Fruits To Control Blood Sugar)

1. पेरू (Guava) –
पेरू हे फळ पोषक तत्वांचे भांडार आहे असे म्हटले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात आढळते, जे इम्युनिटी वाढवण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून (Constipation Problem) मुक्त होण्यास मदत करते. पेरूचे दररोज सेवन केल्याने ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवता येते.

 

2. जांभूळ (Java Plum) –
उन्हाळ्यात येणारे ताजे जांभूळ चवीसह आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते. जांभूळ हे असेच एक फळ आहे.
जे स्टार्चचे साखरेत रुपांतर होऊ देत नाही, त्यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

 

3. संत्रे (Oranges) –
संत्र्याची आंबट गोड चव सर्वांनाच आवडते. संत्रे हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत मानला जातो. संत्र्याचे सेवन केल्याने इम्युनिटी मजबूत करता येते.
इतकेच नाही तर संत्र्याच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- How To Control Blood Sugar | fruits to control blood sugar if you want to under control blood sugar level then consume these fruits daily in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

White Hair Problem | पांढर्‍या केसांची समस्या मुळापासून होईल दूर, फक्त करा ‘हे’ 3 अचूक उपाय; जाणून घ्या

 

Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

 

Mental Health | मानसिक स्वास्थ्य जपा ! ‘या’ 3 गोष्टींपासून अंतर ठेवा; जाणून घ्या