उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सूर्य सध्या आग ओकत आहे. उन्हाचा पारा वाढतोच आहे. अशा दिवसात तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वारंवार पाणी तसेच द्रव पदार्थ घेणे फायदेशीर असते. उन्हाळ्यात फारसे जेवण देखील जात नाही तरीदेखेल वजन वाढते त्यामुळे आपल्या व्यायामासोबाबत सतर्क असणारे अनेक लोक डाएटवर भर देतात आणि आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण, हा डाएट प्लान फॉलो करताना थोडी जरी चुक झाली तर, वजनाच्या बाबतीत पुन्हा ये रे माझ्या मागल्या. म्हणूनच तुम्ही उन्हाळ्यात जर काही पदार्थ आहारात वापरले तर, तुमच्या वाढत्या वजनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच, आपले शरीरही तंदुरूस्त राहू शकते.

कलिंगड – भरपूर पाणी आणि चवदारपणा हा या फळाचे खास वैशिष्ट्य. हे फळ तुम्ही उन्हाळ्यात जितके खाल तितके तुमच्या शरीरातील तपमान कमी राहिली. तसेच, शरीर हायड्रेटही राहिली.

काकडी – अनेकदा या फळाला विशेष अशी चव नसते. पण, सलाड म्हणून हे फळ फार प्रभावी असते. काकडी ही उन्हाळ्यात जाम भारी. तुम्ही काकडीचा रायता बनवूनही खाऊ शकता. काकडीत पाण्याचे प्रमाण प्रचंड असते. काकडी तुमच्या शरीरातील डायजेस्टीव सिस्टमला फायदेशीर ठरते. काकडी खाण्यासाठी विशेष वेळ पाळण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही कोणत्याही वेळी काकडी खाऊ शकता.

टोमॅटो- सलाडमध्ये समावेश होणारा टोमॅटो ही एक फळभाजी आहे. टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीराला फायदेशीर ठरतात.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरी हे केवळ फ्लेव्हर साठी नव्हे तर खाण्यासाठीही चांगले असते. यातील औषधी गुणधर्म तुम्हाला उन्हाळ्यात फायदा देतो.