स्मार्ट फोनमध्ये सुरवातीपासुनच असलेले अ‍ॅप (Pre-Installed App) असे डिलीट करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोणत्याही स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच काही अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असतात. मात्र त्यातील सर्वच अ‍ॅप्स युजर्सच्या गरजेचे असतात असे नाही. हे अ‍ॅप्स मोबाइलची स्पेस आणि प्रोसेसर वापरतात. यामुळे मोबाईलची मेमरी कमी होऊन स्पीड कमी होतो. यातील काही अ‍ॅप्स डिलिट करता येतात तर काही अ‍ॅप्स डिलिट केले तर मोबाइलच्या सिस्टीम व फंक्शनवर परिणाम होऊ शकतो. योग्य पद्धतीने अ‍ॅप डिलिट केले किंवा डिसेबल केले तर फोनची मेमरी व स्पीड नक्कीच वाढतो. स्मार्टफोनमधील हे Pre-installed apps डिलीट करण्यासाठी दोन पद्धती आहेत.

१) फोन सेटिंग्सद्वारे Pre-installed apps डिलीट करा

फोन सेटिंग्समधून काही वेळा हे अ‍ॅप्स पुर्णपणे डिलीट करता येतात तर काही डिसेबल करावे लागतात.
सेटिंग्समध्ये जाऊन जनरल टॅबमध्ये ‘अ‍ॅप्स अ‍ॅन्ड नोटिफिकेशन्स’ या ऑप्शनवर क्लीक करा.
जे अ‍ॅप अनावश्यक आहे त्यावर क्लिक करा. अनइन्स्टॉल आणि फोर्स स्टॉप असे दोन ऑप्शन दिसतील.
अनइन्स्टॉल ऑप्शन सिलेक्ट केला तर अ‍ॅप मोबाईल मधून डिलिट होईल. मात्र काही असे अ‍ॅप असतात ते डिलिट होत नाहीत. त्यासाठी डिसेबल हा ऑप्शन आहे. ते अ‍ॅप डिसेबल केल्यानंतर ते मोबाइलमध्ये दिसणार नाही.

२) गुगल प्ले स्टोअरमधून Pre-installed apps डिलीट करा

गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.
डाव्या बाजूला वर दिसणऱ्या मेन्यू आयकॉनमधून ‘माय अ‍ॅप्स अ‍ॅन्ड गेम्स’वर क्लिक करा. जे अ‍ॅप नको आहे ते अनइन्स्टॉल अथवा डिसेबल करा.
मात्र अनेकदा अ‍ॅप अनइन्स्टॉल केले की गुगलकडून अ‍ॅपचं फक्त अपडेटेड व्हर्जन डिलीट होतं. त्यासाठी अ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यावर त्याचं जुनं व्हर्जन तसचं राहणार नाही याची खात्री करून घ्यावी लागते. असं होत असेल तर अ‍ॅप अनइन्स्टॉलसोबत डिसेबलही करा.

सिनेजगत

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी