पुण्यात ‘कोरोना’ला कसं हरवणार ? महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ 5 मागण्या, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि परिसरामध्ये कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पुण्यात कोरोनाला हरवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
1. खासगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील
– बिलामध्ये नागरिकांची प्रचंड लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे बिलाचे प्रि ऑडिट करावे.
– 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश आहेत, मात्र कार्यवाही नाही
– सेंट्रली बेड्स मॅनेजमेंट तातडीनं करण्यात यावे (ससून, मनपा, खासगी हॉस्पिटल)
– खासगी लॅबवर तूर्त तरी कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रशासनाचा लॅबशी समन्वय नाही.
– उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमले आहेत, त्यांनी यावर नियंत्रण आणावे.
2. महापालिका आर्थिक स्थिती
– 4 हजार 443 कोटी जमा
– 3 हजार कोटी – महसुली, मॅन्डेटरी खर्च, पगार, मेन्टनन्स
– 1400 कोटी – विकासकामे (650 कोटी मागील वर्षीची विकासकामे)
– शिल्लक 800 कोटी
– जवळपास 300 कोटी कोरोनावर खर्च, 75 कोटी जम्बो सेंटरला
– हा सर्व विचार करता राज्य सरकारने तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी
3. कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज
– जुलै अखेर 55 हजार रुग्ण होणार
– 29 जुलै रोजी एकूण रुग्ण 51 हजार 738 तर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 17861 इतकी
अंदाज
15 ऑगस्ट – एकूण 1 लाख रुग्ण
31 ऑगस्ट – 2 लाख रुग्ण
– यामुळे बेड्सची कमतरता, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मोठ्या प्रमाणावर लागतील
– जम्बो सेंट्रर उभारणीपर्यंत व्यवस्थाही अपुरी, त्याची तातडीने सोय करावी.
– 7 हजार ऑक्सिजन बेड्स, 4 हजार 065 आयसीयू बेड्स आणि 1 हजार 900 व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता
4. मृत्यूंचे प्रमाण व अवस्था
ससून आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला चारशे ते पाचशे अधिकचे मृत्यू होत आहेत. मात्र, ते कोरोनाने झाले हे दाखविता येत नाहीत.
– टेस्ट न होता मृत्यू होत आहेत, यात काही मृत्यू हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीचे आहेत
– छातीच्या एक्स-रे ने अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.
– याबाबत सविस्तर चौकशी करून भविष्यातील या मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत
5. टेस्टिंग क्षमता वाढवणे
NIV आणि ससूनमध्ये चाचणीची मर्यादित क्षमता असल्याने ससूनमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठीची यंत्रणा उभी करावी. ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी.