How To Detox Liver Naturally | उन्हाळ्यात आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ 8 गोष्टींचं करा सेवन, काही दिवसातच बाहेर पडतील लिव्हरमध्ये चिकटलेले विषारी पदार्थ

How To Detox Liver Naturally | how to detox liver naturally ayurveda doctor reveal 8 types of summer food that clean your liver naturally
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Detox Liver Naturally | जागतिक लिव्हर (Liver) दिनी लोकांमध्ये लिव्हरशी संबंधित आजार आणि काळजी घेण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येते. दरवर्षी या दिवसाची वेगळी थीम असते. या वर्षी म्हणजेच 2022 ची जागतिक यकृत दिनाची थीम ’Keep Your Liver Healthy And Disease Free’ ही आहे. (How To Detox Liver Naturally)

 

हृदय, किडनी आणि फुफ्फुसांप्रमाणेच लिव्हर हा देखील शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हा त्याच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. लिव्हर हा एक असा अवयव आहे, जो शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक कार्ये करतो. लिव्हर हा शरीराचा दुसरा सर्वात मोठा अवयव आहे ज्याची कार्ये पचन, चयापचय, विषारी पदार्थ काढून टाकणे, पोषक द्रव्ये साठवणे (Digestion, Metabolism, Removal Of Toxins, Storage Of Nutrients) इत्यादी आहेत.

 

फिटनेस गुरू मिकी मेहता (Mickey Mehta) यांच्या मते, संपूर्ण आरोग्य आणि निरोगीपणावर प्रभाव टाकण्यात लिव्हर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, म्हणून ते निरोगी, स्वच्छ आणि मजबूत ठेवणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात अशा अनेक गोष्टी उपलब्ध असतात, ज्यांचा समावेश तुम्ही तुमचे लिव्हर नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी आहारात करू शकता (How To Detox Liver Naturally).

 

1. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय – ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. हे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी (Antioxidants And Vitamin C) चा उत्कृष्ट स्रोत आहे. वर्ल्ड जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये (World Journal Of Gastroenterology) प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ते शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करू शकते.

 

2. लिंबू हे लिव्हरसाठी वरदान (Lemon Is Boon For The Liver)
लिंबू उन्हाळ्यात वरदान आहे. शरीर ताजेतवाने आणि निरोगी ठेवण्यासाठी यापेक्षा चांगले काहीही नाही. लिव्हर स्वच्छ आणि शरीराच्या सर्व अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज लिंबू पाणी (Lemon Water) प्यावे. लिंबू व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे डिहायड्रेशन (Dehydration) टाळते आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते.

3. द्राक्षे मजबूत करतात लिव्हर (Grapes Strengthen The Liver)
उन्हाळ्यात गोड आणि रसाळ द्राक्षे खायला कोणाला आवडत नाही? द्राक्षे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस आहेत. द्राक्षे लिव्हरचे डिटॉक्सिफिकेशन आणि सूज दूर करण्यास मदत करतात.

 

4. लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी दही खा (Eat Curd To Keep Liver Clean)
उन्हाळ्यात पोटाला हलके असणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे आणि दही या यादीत नक्कीच अव्वल आहे. हे सौम्य, थंड आहे आणि तुम्हाला आतून पोषक ठेवण्यास मदत करते. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. अनेक अभ्यासानुसार, ते लिव्हरमधील चरबी नियंत्रित करते.

 

5. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी उपाय – शेवगा (Drumstick)
हिरव्या भाज्यांमध्ये विविध प्रकारचे क्लििंंजग एजंट असतात, जे लिव्हर नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यास मदत करतात. अशीच एक लोकप्रिय हिरवी भाजी म्हणजे शेवगा. अनेक जैवरासायनिक परिणामांनी दर्शविले आहे की शेवग्याच्या पानांमध्ये लिव्हर फायब्रोसिसची लक्षणे कमी करण्याची क्षमता आहे.

 

6. लिव्हर स्ट्रेंथनिंग रेसिपी – आवळा (Amla)
लिव्हरच्या कार्यास मदत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी आयुर्वेदामध्ये आवळा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
तसेच लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होते.
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आवळा पावडर (Amla Powder) मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास चांगले परिणाम मिळतात.

7. हळद स्वच्छ करते लिव्हर (Turmeric Cleanses The Liver)
हळद हा एक अप्रतिम मसाला आहे जो लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करतो.
हे एंजाइम वाढवण्यास मदत करते जे शरीरातून आहारातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकतात.
सकाळी सर्वप्रथम अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या.

 

8. लसूण निरोगी ठेवते लिव्हर (Garlic Keeps The Liver Healthy)
लसणामध्ये अ‍ॅलिसिन आणि सेलेनियम (Allicin And Selenium) सारखे संयुगे जास्त प्रमाणात असते जे लिव्हरला कोणत्याही विषारी नुकसानापासून वाचवते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या खा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- How To Detox Liver Naturally | how to detox liver naturally ayurveda doctor reveal 8 types of summer food that clean your liver naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

 

MP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 

Hair Spa Treatment Benefits | केसांना अधिक सुंदर अन् चमकदार बनवण्यासाठी घरीच करा हेअर स्पा; जाणून घ्या सोपी पद्धत

Total
0
Shares
Related Posts
Kothrud Assembly Election 2024 | Chandrakant Patil's attendance at various programs in the wake of the Legislative Assembly; Organized grand rally and march under the leadership of Amol Balwadkar

Kothrud Assembly Election 2024 | विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांची विविध कार्यक्रमांना उपस्थिती; अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे व पदयात्रेचे आयोजन