‘लॅपटॉप’ आणि ‘कॉम्पुटर’वर Signal अ‍ॅप कसं चालवायचं ते जाणून घ्या, ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : सिग्नल अ‍ॅप ( signal app ) आजकाल भारतात खूप लोकप्रिय होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वापरकर्ते सिग्नल अ‍ॅपवर वाढतच चालले आहेत. देशभरातील लाखो लोक हे मॅसेजिंग अ‍ॅप डाऊनलोड करीत आहेत. हेच कारण आहे की सिग्नल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) चे टॉप फ्री डाऊनलोडिंग अ‍ॅप बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोबाईलवर तसेच डेस्कटॉपवर देखील करता येतो. याच प्रमाणे टेलिग्राम (Telegram) चा देखील लॅपटॉप आणि संगणकासोबत टेलीग्राफवर वापर केला जाऊ शकतो. या दोन्ही प्लॅटफॉर्मची एक वेगळी वेब आवृत्ती आहे. तथापि, सिग्नलच्या बाबतीत असे नाही. सिग्नलसाठी कोणतीही वेगळी वेब आवृत्ती नाही. जर आपल्याला सिग्नल अ‍ॅप ( signal app ) लॅपटॉप किंवा पीसी वर वापरायचे असेल तर यासाठी आपल्याला अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. पीसी आणि लॅपटॉपवर सिग्नल अ‍ॅप कसे वापरायचे त्याबद्दल जाणून घेऊया.

पीसी आणि लॅपटॉपवर सिग्नल अ‍ॅप कसे वापरावे

– सर्वप्रथम आपल्याला वेब ब्राउझरवर सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी https://signal.org/download/. वर क्लिक करावे लागेल.
– सिग्नल अ‍ॅपच्या डेस्कटॉप आवृत्तीसाठी सिंपल Download for Windows पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– यानंतर अ‍ॅप डाऊनलोड होण्यास सुरवात होईल. वापरकर्त्याला या फाईलवर क्लिक करावे लागेल. यानंतर ते इंस्टॉल करावे लागेल. ही सुमारे 116MB ची फाईल असेल. तथापि, हे महत्वाचे आहे की आपले डिव्हाइस एका चांगल्या नेटवर्कसह कनेक्ट केलेले असावे. यास थोडा वेळ लागेल.
– अ‍ॅप इंस्टॉल झाल्यानंतर आपल्याला विंडो लॅपटॉप ऑप्शन दिसेल.
– यानंतर आपल्याला Signal अ‍ॅप मोबाइल अ‍ॅप वर उघडावे लागेल. यानंतर सेटिंग्ज मेनूने डेस्कटॉप अकाउंटला लिंक केले जाऊ शकते.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये सेन्सर टॉवरच्या डेटाच्या हवाल्याने लिहिण्यात आले होते की सिग्नल अ‍ॅपला गेल्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर 100,000 हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन इंस्टॉलेशनमध्ये 11 टक्क्यांनी घट झाली आहे.