लॉकडाऊनमध्ये करायची असेल एक्स्ट्रा कमाई तर पैसे न लावता घरात सुरू करा ‘हे’ काम, पहिल्या दिवसापासून होऊ लागेल इन्कम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसमुळे देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. यासाठी आम्ही अशा काही आयडिया देत आहोत ज्याद्वारे पैसे न गुंतवता सुद्धा घरबसल्या चांगले पैसे कमावू शकता. कमाईच्या या आयडिया वेगवेगळ्या टॅलेंटच्या आधारावर आहेत आणि तुम्ही टॅलेंट किंवा वर्क प्रोफाइलच्या आधारावर कोणत्याही आयडियाची निवड करू शकता. लॉकडाऊनमध्ये एक्स्ट्रा कमाई करण्याच्या पद्धती जाणून घेवूयात…

यू-ट्यूबद्वारे करू शकता कमाई
यू-ट्यूबद्वारे पैसे कमवायचे असतील तर खास व्हिडिओ बनवून यू-ट्यूबवर अपलोड करा आणि काही टेक्निकल गोष्टी लक्षात ठेवा. येथे व्ह्यूजला तुम्ही पैशांत कर्न्व्हट करू शकता. युनिक कंटेंटच तुम्हाला जास्त इन्कममध्ये मदत करेल. यूट्यूबद्वारे जी कमाई होते, तिचा 45 टक्के भाग यूट्यूबकडे जातो आणि उर्वरित 55 टक्के भाग तुमच्याकडे येईल. ही कमाई तुमच्या चॅनलवर येत असलेल्या जाहिरातीद्वारे होते. जस-जसे तुमच्या व्हिडिओंचे व्ह्यूज वाढत जातील, तस-तसे इन्कम वाढ जाईल.

फ्रीलान्स काम बनते आधार
फ्रीलांस कामाद्वारे तुम्ही खुप पैसे कमावू शकता. अनेक लोक केवळ फ्रीलान्सिंग करून पैसे कमावतात. फ्रीलांस काम अनेक प्रकारची असतात. जी टॅलेंटच्या आधारावर निवडू शकता. तुम्ही फोटोग्राफी करू शकता तर हे करू शकता. याशिवाय रायटिंग, एडिटिंग, डिझायनिंग, वेब डिझायनिंग, प्रोग्रॅमिंगद्वारे चांगले पैसे कमावू शकता. स्किलच्या हिशेबाने कोणतेही काम करू शकता, याबदल्यात पैसे मिळतील.

ऑनलाईन क्लास
सध्या ऑनलाईन क्लासद्वारे जास्त कमाई होत आहे. अगोदरपासून टिचिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला ऑपशन आहे.

वेबसाइटद्वारे कमाई
लॉकडाऊनदरम्यान लोकांनी वेगवेगळ्या आयडिया वापरून वेबसाइट बनवल्या आणि त्याद्वारे पैसे कमावले. जसे की, एखाद्याने ऑनलाइन जेवण उपलब्ध करणे, ऑनलाइन परीक्षा करण्याची वेबसाइट सारखे स्टार्टअप सुरू करून कमाई केली आहे. तुमच्याकडे एखादी युनिक आयडिया असेल तर तुम्ही सुद्धा वेबसाइट बनवून चांगले पैसे कमावू शकता.

कार भाड्याने द्या
जर तुमच्याकडे कार आहे आणि आता कारचा वापर होत नसेल तर तुम्ही ती रेंटवर देऊन पैसे कमावू शकता. यामुळे तुमची पार्किंगमध्ये उभी गाडी कमाई करून देईल. तुम्ही अनेक प्रकारे ती रेंटवर देऊ शकता.