घरी बसल्या ‘ऑनलाइन’ महिन्याला १५००० कमवा, ‘या’ ५ वेबसाईटवर ‘संधी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या पगाराव्यतिरिक्त वेगळे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातीलच एक मार्ग म्हणजे ऑनलाईन पैसे मिळवणे. कित्येकांना ऑनलाईन पैसे कमावता येतात हे माहित आहे, मात्र ते कशा प्रकारे मिळवता येते त्याचा मार्ग माहित नाही, त्यामुळे इच्छा असूनदेखील त्यांना हे काम करता येत नाही.

यातील एक प्रकार म्हणजे ऑनलाईन वेबसाईट्सवर असलेल्या जाहिरातींवर क्लिक करून पैसे कमावणे. यासाठी मार्केटमध्ये अनेक वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला अशा प्रकारे पैसे कमावण्याच्या संधी देत आहेत. यासाठी तुम्हाला पीटीसी वेबसाइट वर अकाउंट काढावे लागते. काही वेबसाईट्स तुम्हाला मोबाईल आणि टॅब्लेट्सवर केलेल्या जाहिरातींवर क्लिक केल्यानंतर पैसे देत नाहीत. यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्पुटरचा वापर करावा लागतो.

paypal

कोणकोणत्या वेबसाईट्सवर तुम्ही हे करू शकता

१) Neobux

या वेबसाईट्सवर तुम्ही जाहिरातींवर क्लिक करून पैसे कमवू शकता. या वेबसाइट्सवर तुम्ही २ डॉलर्सची कमाई केल्यानंतर तुम्हाला ते पैसे देण्यास सुरुवात करतात. पीटीसी वेबसाइटवर हि साईट सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.

२) ClixSense

एका रिपोर्टनुसार तुम्ही या वेबसाईटवर मासिक १५ हजार रुपये कमाई करू शकता. PayPal, Payoneer या ऍपद्वारे तुम्हाला तुमची कमाई हि वेबसाईट तुमच्या बँक खात्यावर जमा करते.

३) Swagbucks

या वेबसाईटवर तुम्ही बाजारात आलेल्या नवीन वस्तूंविषयी देखील माहिती मिळवू शकता. तुम्ही पाहिलेल्या जाहिरातींनुसार तुम्हाला पॉईंट्स देण्यात येतात. या पॉइंट्सद्वारे तुम्ही अमेझॉन या शॉपिंग वेबसाइटवरून खरेदी करू शकता.

४) PrizeRebel

या वेबसाइटवरून तुम्ही मासिक १० ते १२ हजार रुपये कमाई करू शकता. तुमचे १०० पॉईंट्स झाल्यानंतर तुम्हाला १ डॉलर कमावता येतो. PayPal, Payoneer या ऍपद्वारे तुम्हाला तुमची कमाई हि वेबसाईट तुमच्या बँक खात्यावर जमा करते.

५) InboxDollars

हि एक अमेरिकन कंपनी असून या वेबसाईट्सवर जाहिराती पाहून तुम्ही मासिक १०० डॉलर पर्यंत कमाई करू शकता.

आरोग्यविषयक वृत्त –

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

डोकेदुखीची वेदना एक…परंतु, कारणे असू शकतात वेगवेगळी