विना नेटवर्क दुसर्‍या नंबरवर Call करू शकतील iPhone आणि Android चे यूजर्स, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : नेटवर्क खराब असल्याने नेहमी कॉल करण्यात अडचणी येतात. परंतु आता लोकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. आता यूजर्स नेटवर्कच्या शिवायसुद्धा आपल्या नंबरवरून दुसर्‍या नंबरवर कॉल करू शकतील. जाणून घेवूयात कसे…

अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्स करू शकतील वापर
अनेक टेलीकॉम ऑपरेटर्स आपल्या यूजर्सला वाय-फाय कॉलिंगची सुविधा देत आहेत, जिच्या मदतीने विना नेटवर्क सुद्धा कॉलिंग केले जाऊ शकते. अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंगच्या अनेक फोनमध्ये हे इन्बिल्ट फीचर असते, फक्त त्यास अ‍ॅक्टिव्हेट करावे लागते.

आयफोन यूजर्स असे करू शकतील वाय-फाय कॉलिंग
आयफोन यूजर्सला सर्वप्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल आणि नंतर चेक वाय-फाय कॉलिंगवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला वायफाय कॉलिंग ऑन करावे लागेल. यानंतर तुम्हाला बॅक बटन दाबून मागील स्क्रीनवर जावे लागेल. तिथे तुम्हाला ’ऑदर डिव्हाईस’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला केवळ दुसर्‍या फोनसाठी हे फीचर ऑन करावे लागेल.

अँड्रॉईड फोनवर कसे कराल वाय-फाय कॉलिंग
अँड्रॉईड यूजर्सला सर्वप्रथम सेटिंग नेटवर्क आणि इंटरनेट चेक करावे लागेल आणि नंतर वायफाय कॉलिंग. आपल्या टेलीकॉम ऑपरेटरद्वारे देण्यात आलेल्या गाईडलाईन फॉलो कराव्या लागतील. यानंतर तुम्ही स्मार्टफोनवर वायफाय कॉलिंग अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

या गोष्टीकडे ठेवा खास लक्ष
हे फीचर अनेबल होताच आपल्या आयफोनवरून कोणत्याही नेटवर्कशिवाय सुद्धा कॉल करू शकता. यासाठी केवळ तुमचा फोन वाय-फायने कनेक्ट राहिला पाहिजे. सोबतच हे चेक करणे आवश्यक आहे की, तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर वाय-फायला सपोर्ट देत आहे किंवा नाही. याची माहिती तुम्ही कस्टमर केयरशी बोलून मिळवू शकता.

माहितीनुसार, सध्या एयरटेल, जीओ, वोडाफोन-आयडीया आपल्या यूजर्सला फ्री वायफाय कॉलिंगची सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही अ‍ॅपसुद्धा डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र, बीएसएनएल यूजर्सला वाय-फाय कॉलिंग करण्यासाठी विंग्ज अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि सर्व्हिससाठी 1099 रुपयांची रजिस्ट्रेशन फी सुद्धा द्यावी लागेल.