COVID-19 : घर, ऑफिस आणि बाहेर कसं लढायचं ‘कोरोना’ व्हायरसशी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन ३.० सुरू झाले आहे. यात सरकारकडून अनेक कामांसाठी सूट देण्यात आली आहे. जेणेकरुन लोक त्यांचे दैनंदिन काम अधिक चांगल्या प्रकारे उरकू शकतील. पण या कालावधीत आपण बरीच सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकलच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचे संचालक आणि प्रख्यात वायरोलॉजिस्ट डॉ. देव प्रसाद चट्टोपाध्याय म्हणतात की, कोरोना विषाणूमुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

पुढील काही दिवसांत तो सामान्य फ्लूसारखा होईल आणि आपल्याला त्याच्याबरोबर जगण्याची सवय करावी लागेल. आपण या सवयींना काही खबरदारीच्या पावलांद्वारे सुनिश्चित करू शकतो. अशा काही पावले जाणून घेऊया.

सुरक्षितता आपला अधिकार आहे
कोरोना विषाणूची लक्षणे प्रत्येकामध्ये दिसून येत नाहीत. अशात आपल्याला या लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूची कोणीतीही व्यक्ती कोविड-१९ चा वाहक असू शकते आणि आपल्याला संक्रमित करू शकते. आपण स्वतः देखील कोविड-१९ चे वाहक असू शकता. म्हणून स्वत:ला अशा प्रकारे प्रशिक्षण द्या की आपण कोणालाही संक्रमण होऊ देणार नाही किंवा आपण कोणाकडून संक्रमित होणार नाही.

ऑफिसमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा

ई-मिटिंगला प्राधान्य द्या
ऑफिसमध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे टाळा
एकदा ऑफिसच्या आत गेल्यावर, पुनःपुन्हा आत-बाहेर करणे टाळा
जर कॉन्फरन्स रूम मीटिंग असेल, तर शारीरिक अंतर ठेवा आणि कमीतकमी लोक बोलवा
घरचे जेवण घेऊन जा, आपल्या जागी जेवण करा आणि उरलेल्या अन्नाची जबाबदारीने विल्हेवाट लावा

ऑफिसमध्ये या चार नियमांचे पालन करा
येण्या-जाण्यासाठी पायऱ्यांची सवय लावा
लिफ्टमध्ये जायचे असेल, तर शारीरिक अंतर ठेवा
दरवाजा उघडण्यासाठी कोपर वापरा
जर आपण लिफ्टचे बटण, दाराचे हँडल सारख्या कोणत्याही भागास स्पर्श केला असेल, तर आपले हात सतत स्वच्छ ठेवा.

ऑफिसमधून जेव्हा घरी जाल
अंघोळ करा
हात चांगले धुवा
रस्त्यात मास्क घाला
घराच्या बाहेर शूज काढा आणि आत जाण्यापूर्वी बॅग बाहेर ठेवा

घरातून करा सुरुवात
मास्क घाला
सॅनिटायझर नेहमी जवळ ठेवा
बाहेरून येणाऱ्या सदस्यांपासून शारीरिक अंतर ठेवा
तापमान तपासा, ताप असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, घरी रहा
आपल्या कारला किंवा इतर वाहनास स्पर्श करत असल्यास सॅनिटायझर वापरा

सार्वजनिक वाहनांचा वापर करताना
प्रवास करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करा
चालक दल सदस्यांसह सर्व प्रवाशांनी मास्क घातले आहे, याची खात्री करा
शारिरीक अंतर असल्याचे सुनिश्चित करा
एसी बंद ठेवा आणि ताज्या हवेसाठी खिडकी उघडा.

नेहमी लक्षात ठेवा कुठेही थुकू नका
ओल्या बोटाने पाने उलटू नका किंवा नोट्स इत्यादी मोजू नका.
कोणाबरोबरही अन्न, पाणी आणि ऑफिस स्टेशनरी शेअर करू नका
गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा, हात मिळवू नका, नमस्कार सर्वात उत्तम अभिवादन
हातावर कफ येऊ देऊ नका (खोकताना किंवा शिंकताना कोपर किंवा टिश्यू पेपर वापरा)

असे करा बॅग किंवा शूज स्वच्छ
जंतुनाशक लिक्विडचा वापर करा किंवा अँटिसेप्टिक लिक्विड वापरू शकता
यासाठी ऑफटर शेव लोशन, डीओडरंट देखील वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, नंतर हात धुवा.

जर आपण औषध किंवा किराणा घ्यायला जाल आपल्याबरोबर बॅग घेऊन जा, प्रवेश स्थानावरच सर्व पॅकेट काढा, स्वच्छ करा आणि सामग्री काढ .भाज्या पांढर्‍या व्हिनेगरमध्ये धुवा, पाण्याचे द्रावण १:४ च्या प्रमाणात असेल