ट्विटरवरील जुनं ट्विट सापडत नाही मग वापरा ‘ही’ सोपी युक्ती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  जगात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचे ट्रेंड सातत्याने ट्विटरवरती आपणास पाहायला मिळतात. त्यामुळे ट्विटर दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. मात्र आपणास एखाद ट्विट शोधायचं असेल तर ते खूप किचकट काम होवून जात. त्यासाठी हॅशटॅगद्वारे एखाद्या टॉपिकशी निगडित ट्विट शोधल्यावर सहज भेटत. परंतु, ठराविक असे ट्विट शोधायचं म्हटलं तर सर्च करण्यात खूप वेळ जातो आणि शोधाशोध करुन सुद्धा ते ट्विट सापडत नाही.

एखादे ट्विट सर्च करण्यासाठी ट्विटरवर सर्च हा पर्याय पहिल्यापासून उपलब्ध आहे, त्यात सर्च केल्यास शब्दांशी निगडित ट्विट्स समोर येतात. पण, नेमकं शोधत असलेले ट्विट सापडण्यात अडचण येते. म्हणून ट्विटर वापरकर्त्यांची ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. अशावेळी ट्विटरकडे एडव्हान्स सर्च नावाचा पर्यायही आहे. मात्र, यासंदर्भात खूप कमी वापरकर्त्यांना माहिती आहे. माइक्रोब्लॉगिंग साइट असलेल्या ट्विटरकडे ‘एडव्हान्स ट्विट सर्च’ नावाचे एक टूल आहे.

त्याचा वापर करण्यासाठी वापरकर्ते twitter.com/search-advanced ही लिंक ब्राऊजरवर सर्च करु शकतात. इथे तुम्हाला ट्विट शोधण्यासाठी अनेक फिल्टरचे पर्याय सापडतील. यात तुम्ही एखाद्या की-वर्ड किंवा टर्मचा वापर करुन ट्विट शोधू शकतात. तसेच, इतरांचं किंवा तुमचं एखाद ठराविक ट्विट देखील सहज पणे सोप्या पद्धतीने शोधू शकता. त्याशिवाय ट्विटर एडव्हान्स सर्चमध्ये तुम्हाला तुम्ही आतापर्यंत केले सर्व ट्विट्स डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी प्रोफाइलच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये तुम्हाला Request your archive असा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर इमेलद्वारे तुमचे ट्विट्स पाठवले जातील.