LIC पॉलिसी घेतल्यानंतर ‘एजंट’ने सांगितलेलं चुकीचं निघाल्यास ती ‘अशी’ करा परत, टेन्शन ‘फ्री’ मिळवा पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याच वेळा आपण एजंटच्या सांगण्यावरून किंवा खूप मोठा फायदा दिसतोय म्हणून एखादी पॉलिसी काढतो. मात्र पॉलिसीचे पेपर हातात पडल्यावर आपल्याला समजते की आपल्याला या आधी सांगितलेले फायदे वेगळेच होते. अशा वेळेस पॉलिसीचे भरलेले पैसे वाया जाणार का ? याचीच माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत.

आता पॉलिसी काढल्यानंतर सुद्धा ती रद्द केल्यानंतर पैसे परत भेटू शकतात. फ्री लूक नियमानुसार जर १५ दिवसात पॉलिसी रद्द केली तर तुम्हाला तुम्ही भरलेले पैसे परत मिळू शकतात. इरडाच्या नियमानुसार पॉलिसी कंपन्या फ्री लुक अवधी ग्राहकांना देऊ शकते.

पॉलिसी रीफंड कशी करायची ?
फ्री लुकचा वापर ३ वर्षापेक्षा जास्त विमा पॉलिसीवर तसेच आरोग्यधारक पॉलिसीसाठी लागू होते. या अधिकाराचा उपयोग पॉलिसी मिळाल्यानांतर १५ दिवसाच्या आत करणे गरजेचे आहे. पॉलिसीची तारीख सिद्ध करण्याची जबाबदारी पॉलिसीधारकावर असते.

फ्री लुक संबंधीच्या माहितीसाठी पॉलिसी धारक कंपनीला लेखी विचारणा करू शकतात आणि कंपनीच्या वेबसाईट वरून त्यासंबंधी फॉर्म घेऊ शकतात. पॉलिसीधारकाला पॉलिसी घेतल्याची तारीख, एजंटचे नाव, पॉलिसी रद्द करण्याचे किंवा बदलण्याचे कारण सांगावे लागते. पॉलिसीची सगळी कागदपत्रे आणि पैसे माघारी घेण्यासाठी कंपनीला बँकेची माहिती द्यावी लागेल.

सगळं करूनही किती पैसे भेटणार परत
फ्री लुक चा वापर करूनही पॉलिसी रद्द केल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर ग्राहकाला सर्व पैसे मिळणार नाहीत कारण भरलेल्या प्रीमियर मधील काही रक्कम विमा कंपन्या मेडिकल टेस्ट आणि स्टाफ ड्युटीचा खर्च काढून घेणार आणि उर्वरित रक्कम ग्राहकाला मिळणार.

आरोग्यविषयक वृत्त