पंतप्रधान ‘किसान सन्मान निधी’ योजनेची रक्‍कम मिळली नसल्यास ‘येथे’ करा तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली. या योजनेचा अनेक शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या उपयोग करून घेतला. मात्र अनेक असेही शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा फायदा घेता आला नाही. देशातील ६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार रुपये जमा झाले. मात्र ८.५ कोटी शेतकऱ्यांना अद्याप याचा लाभ मिळालेला नाही. याची तक्रार कोठे द्यावी हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी ही माहिती अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

जर आतापर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ घेता आला नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आहे. अशा लोकांनी कृषि अधिकारी आणि लेखापाल यांच्याशी संपर्क केला पाहिजे. तसंच आपल्या राज्यातील जन सुनवाई पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकता. तसंच किसान मित्राची मदतही घेऊ शकता. या सर्वांचा उपयोग करूनही काहीच फायदा झाला नाही तर सरळ केंद्रीय कृषि मंत्रालयातील किसान हेल्प डेस्कवर ई-मेल करू शकता. [email protected] असा हा मेल आयडी आहे.

येथेही काही काम झाले नाही तर ०११-२३३८१०९२ या नंबरवर फोन करून आपली समस्या सांगू शकता. तसंच याच योजनेच्या वेलफेअर सेक्शनमध्येही तुम्ही संपर्क करू शकता. याचा दिल्लीमधील फोन नंबर ०११-२३३८२४०१ असा आहे, तर मेल आयडी [email protected] असा आहे.

जर कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात पंतप्रधान किसान सम्मान निधीची रक्कम आली नसेल तर त्यावर तोडगा काढण्यात येईल असं केंद्रीय कृषि राज्यमंत्री कौलाश चौधरी यांनी सांगितलं आहे. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रार दिली असून त्यांना त्यांच्या कृषि अधिकाऱ्यांच्या आणि लेखापालांच्या कामचुकार पणामुळे लाभ मिळत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन वेळा २ हजार रुपये आले आहेत. काहींच्या खात्यात एकदा आल्यानंतर दुसऱ्यांदा आलेले नाहीत. तर काही असे आहेत ज्यांना एकदाही याचा लाभ मिळालेला नाही. त्यांनी आपल्या कृषि अधिकाऱ्याशी संपर्क करने गरजेचे आहे. त्यांना विचारा की आपले नाव लाभार्थीच्या यादीत आहे की नाही ते विचारा. तसंच त्यांनी यावेळी मोदी सरकार देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना पैसे देऊ इच्छिते. सरकारच्या इच्छेच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही तक्रार करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त