मोफत रेशनसाठी आता नाही लागणार Ration Card , सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रेशन कार्ड (Ration Card) आधारशी जोडण्याची (Aadhar Link) प्रक्रिया सतत सुरू आहे. मोदी सरकार (Modi Government) यासाठी काम करत आहे. आधारशी लिंक झाल्यानंतर ग्राहकांना रेशन दुकानावर रेशन कार्ड घेऊन जाण्याची आवश्यकता भासणार नाही. रेशन कार्डच्या नंबरद्वारेच दुकानदार ग्राहकांला त्याच्या वाट्याचे धान्य देईल.

केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतरच असे लाभार्थी ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांना सुद्धा मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. दिल्लीसह अनेक राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश या आदेशाचे पालन करत मोफत रेशनचे वाटप करत आहेत. ही योजना अगोदर तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती, नंतर केंद्र सरकारने नोव्हेंबरपर्यंत वाढवली.

केंद्र सरकारनुसार ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, तरीसुद्धा त्यांना 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जात आहे, परंतु सरकारची ही योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत आहे. नोव्हेंबरनंतर ज्या लोकांनी रेशनकार्ड आधारशी लिंक केले आहे, त्यांना रेशनकार्ड नसतानाही धान्य दिले जाईल.

अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी 10 राज्यांना विनंती केली आहे की, मोफत रेशन देण्याची योजना 3 महिन्यांसाठी आणखी वाढवली जाऊ शकते. रेशनकार्डशिवाय सुद्धा लोक नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य घेऊ शकतात. परंतु, अनेक ठिकाणी हे धान्य लोकांना रेशनदुकानदार देत नसल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात येत आहेत.

पीएम मोदी यांनी 30 जून 2020 ला राष्ट्राला संबोधित करताना देशाची सध्याची स्थिती आणि पुढील महिन्यांमध्ये असलेले सण पाहता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा पुढील 5 महिन्यांसाठी म्हणजे नोव्हेंबर 2020 पर्यंत विस्तार केला होता. या अंतर्गत देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना त्यांच्या मासिक पात्रतेशिवाय प्रति व्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबाला 1 किलो चना उपलब्ध करून दिला जात असल्याचे म्हटले जात आहे.