वेळ अन् पैसाही वाचणार ! PAN कार्ड 10 मिनीटांमध्ये मोफत मिळतेय, जाणून घ्या इन्कम टॅक्स विभागाच्या सेवेबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक भारतीयासाठी पॅन कार्ड आवश्यक कागदपत्र आहे. हे प्राप्तीकर विभागाकडून दिले जाते. पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असते. पॅन कार्ड कोणत्याही व्यक्तीच्या पैशाचा इनफ्लो आणि आऊटफ्लो ट्रॅक करण्यासाठी उपयोगी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र, आता नवीन पॅनकार्ड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ किंवा कालावधी जात नाही. तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबरद्वारे काही मिनिटांत इन्स्टंट पॅन कार्ड तयार करु शकता. जाणून घ्या पॅन कार्ड बनवण्याच्या मोफत सुविधेसंदर्भात.

पॅनकार्ड म्हणजे काय ?
पॅन, अर्थात पर्मनन्ट अकाउन्ट नंबर हा भारतीय नागरिकाची ओळख आहे. या 10 आकडी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षरे असतात. भारतीय आयकर कायदा, 1961 अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो. पॅन आयकर विभाग देतो. इन्स्टंट पॅन कार्डसाठी आधार कार्डद्वारे अर्ज केल्यास केवळ 10 मिनिटांत पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड तुम्हाला मिळते.

नवीन पॅन कार्डसाठी अर्ज
नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्याठिकाणी न्यू पॅन यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर पुढे तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर द्यावा लागेल. परंतु, यावेळी तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. कारण केवायसी पूर्ण करण्यासाठी पाठवला जाणारा ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांकावर येतो.

पॅन कार्ड कसे बनवायचे ?
स्टेप 1 – सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या ई फाइलिंग पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2 – इथे इन्स्टंट पॅन कार्ड आधार या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 – पुढे गेट न्यू पॅन कार्डवर क्लिक करा. यानंतर नव्या पॅनकार्डसाठी आधार क्रमांक नोंद करा.
स्टेप 4- कॅपचा कोड टाकून आधार ओटीपी जनरेट करा. तो तुमच्या मोबाईलवर येईल. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा आणि आधार डिटेल्स प्रमाणित करा. यानंतर तुम्ही तुमचे नवीन पॅन कार्ड डाऊनलोड करा.

पॅन कार्ड कसे डाऊनलोड करायचे ?
तयार झालेले नवीन पॅन कार्ड पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करु शकता. यासाठी चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅनवर तुमचा आधार नंबर नोंदवावा लागेल. याशिवाय तुमचा ई-मेल आयडी आधार क्रमांकाशी संलग्न असेल तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मधील पॅन कार्ड तुमच्या ई-मेल वर उपलब्ध होईल.