कामाची गोष्ट ! फक्त 10 मिनिटांत बनेल PAN कार्ड; सरकारच्या ‘या’ सुविधेचा लाभ घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   आधार कार्ड देशातील महत्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. बँकेकडून सिमकार्ड घेणे आणि पासपोर्ट बनविण्यापर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो. आधार कार्डचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला बऱ्याच कागदपत्रांपासून सुटका मिळते. जर तुम्हीही त्या लोकांमधील एक आहात ज्यांच्याजवळ पॅन कार्ड नाही आणि कोणत्या कामासाठी पॅन कार्डची त्वरित गरज भासेल तेव्हा ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही सरकारच्या या सुविधेचा फायदा घेऊन फक्त १० मिनिटांत पॅन कार्ड बनवू शकता. जाणून घ्या कसे…

आतापर्यंत तुम्ही पॅन कार्ड बनविण्यासाठी दोन पेजचा फॉर्म भरत होता आणि तुम्हाला महिन्यांची वाट पहावी लागत होती. तुमच्या या समस्येचे समाधान सरकारने केले आहे. आयकर विभागाने एक नवीन सुविधा सुरु केली आहे ज्या अंतर्गत आधार कार्डच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत पॅनकार्ड बनविले जाऊ शकते. अर्ज कसा करावा हे जाणून घेऊया.

यानंतर आपला आधारकार्ड नंबर टाका आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. यानंतर, आधार कार्डसह नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर ई-मेल आयडी टाका आणि पॅनकार्डसाठी आवश्यक माहिती भरा.

फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आपला पॅन १० मिनिटात मिळेल जो तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्ही या संकेतस्थळावरील ”Check Status/Download PAN” पर्यायावर क्लिक करून पॅन कार्ड पीडीएफमध्ये डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला हार्ड कॉपी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतील.