खोकला, सर्दी, कफ, ताप आणि घशातील खवखव सर्व एकाचवेळी गायब करेल ‘हा’ देशी काढा, अवघ्या 10 मिनिटात होईल तयार

पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळा सुरू आहे आणि मागील काही दिवसांपासून पाऊस सुद्धा होत आहे. यामुळे थंडी आणखी वाढली आहे. थंडीत इम्यूनिटी सिस्टम (Immunity system) कमजोर होण्याचा सर्वात मोठा धोका असतो. यामुळेच हिवाळ्यात अनेक लोकांना सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव आणि इतर संसर्गजन्य आजार होतात. सध्या कोरोनाचा प्रकोप सुद्धा सुरू आहे. यामुळे आम्ही तुम्हाला असे देशी काढे सांगणार आहोत ज्यामुळे या समस्या दूर होतील आणि इम्युनिटी (Immunity system) सुद्धा मजबूत होईल.

1 दालचिनी आणि लवंगचा काढा
भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. ते गरम झाल्यानंतर एक दालचिनीचा तुकडा टाका. दोन तीन लवंग आणि एक हिरवी वेलची टाका. आता एक चमचा ओवा, एक चमचा खिसलेले आले, अर्धा चमचा काळे मिठ, अर्धा चमचा हळद, काळी मिरी कुटलेली अर्धा चमचा टाका. यामध्ये तुळशीची पाच-सहा पाने सुद्धा टाका. कोमट करून काढा प्या. दिवसातून दोन वेळा घ्या. यामुळे छातीतील जळजळ दूर होते. इम्युनिटी वाढते. सर्दी, खोकला, ताप दूर राहतो.

2 आले आणि गुळाचा काढा
उकळत्या पाण्यात वाटलेली लवंग, काळीमिरी, वेलची, आले आणि गुळ टाका. थोडावेळ उकळू द्या, नंतर यामध्ये काही तुळशीची पाने टाका. जेव्हा पाणी निम्मे होईल तेव्हा गाळून कोमट करून प्या.

3 काळीमिरी आणि लिंबूचा काढा
एक चमचा काळीमिरी आणि चार चमचे लिंबूरस एक कप पाण्यात मिळसून गरम करा. हे रोज सकाळी प्या. हे थंड झाल्यानंतर यामध्ये मधसुद्धा टाकून पिऊ शकता. यामुळे सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. फॅट बर्न होते. ताजेपण, उत्साह जाणवतो.

4 ओवा आणि गुळाचा काढा
एक ग्लास पाणी उकळवून घ्या. नंतर त्यामध्ये थोडा गुळ आणि अर्धा चमचा ओवा टाका. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा गाळून कोमट करून प्या. यामुळे पचनक्रिया ठिक होते. गॅस, अपचनाची समस्या सुद्धा दूर होते. तसेच खोकला आणि पोटदुखी सुद्धा दूर होते.