डोळ्यांखालची काळी वर्तुळं ‘या’ 7 घरगुती उपायांनी होतील नाहीशी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सौंदर्य हे फक्त चेहर्‍याच्या त्वचेवर अवलंबून नसते तर त्यासाठी तुमचे डोळे, ओठ यांचे आरोग्यही चांगले असणे आवश्यक असते. अनेकदा डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे आल्याने सौंदर्याला ती बाधक ठरतात. ही डार्क सर्कल्स दूर करायची असल्यास काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहेत, हे उपाय जाणून घेवूयात.

हे आहेत घरगुती उपाय

1 एक चमचा गुलाब पाणी, दोन मोठे चमचा दही आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण डोळ्यांखाली लावा. नंतर थंड पाण्याने धुवून स्वच्छ करा. या उपायाने डार्क सर्कल्स दूर होतील.

2 टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रत करून डोळ्यांभोवती लावा.

3 गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध याची एकत्रित पेस्ट डोळ्यांभोवती लावा.

4 काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिटे ते डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतील. शिवाय डोळ्यांना आरामसुद्धा मिळेल.

5 काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून डोळ्याखाली 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवा. यामुळे डार्क सर्कलची समस्या कमी होईल आणि डोळे सुद्धा आकर्षक वाटतील.

6 कच्च्या बटाट्याचे छोटे स्लाईस किंवा रस डोळ्याभोवती लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतील.

7 एक चमचा बदाम पेस्ट आणि दूध यांचे मिश्रण डोळ्यांखाली लावा, यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात. तसेच चेहर्‍याचे सौंदर्य खुलते.