Home Remedies : कंबरदुखीपासून मिळेल मुक्ती, करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, जाणून घ्या

ऑफिसमध्ये 9 ते 5 चा जॉब केल्याने अनेक लोकांना कंबरदुखी, पाठदुखीची समस्या होते. यामध्ये चुकीच्या पद्धतीने बसणे, वाकून बसणे, स्क्रीनच्या समतोल न बसता खाली होऊन बसणे, कॅल्शियमची कमतरता, आदी कारणे असतात. 25 ते 45 वयात या समस्या जास्त आहेत. या समस्येवर काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

1 रोज सकाळी मोहरी किंवा खोबरेल तेलात दोन किंवा तीन पाकळ्या लसून टाकून गरम करा. तेल थंड करा आणि या तेलाने कंबरेचे मॉलिश करा. खुप फायदा मिळेल.

2 कढईत दोन किंवा तीन चमचे मीठ गरम करा. सुती कपड्यात ते बांधून त्याचा शेक घ्या. आराम मिळेल.

3 ओवा तव्यावर हलका भाजून घ्या. तो एका डब्यात भरून ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खा आणि गिळा. एक महीना हा उपाय केला तर पाठदुखीत खुप आराम पडतो.

4 जास्त नरम गादी असलेल्या सीटवर बसू नका. थोड्या कडक खुर्चीवर बसून काम करा.

5 कंबरदुखी दूर करण्यासाठी नियमित योगा करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like