How To Get Rid Of Blackheads | सहजपणे मिळवू शकता ‘ब्लॅकहेड्स’पासून मुक्ती, केवळ करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Get Rid Of Blackheads | त्वचेच्या सर्व समस्यांपैकी ब्लॅकहेड्स (Blackheads) सर्वात हट्टी असतात. त्यांच्या नावावरून स्पष्ट होते की ते चेहर्‍यावर काळ्या डागाप्रमाणे असतात. आपल्या त्वचेवर छिद्रे असतात जी मृत त्वचेच्या पेशी (Skin Cells), तेल (Oil) आणि बॅक्टेरिया (Bacteria) यांच्या एकत्रितपणामुळे सहजपणे बंद होतात. ही घाण नंतर त्वचेच्या पृष्ठभागावर साठते, हवेच्या संपर्कात आल्यावर तिचे ऑक्सिडायझेशन (Oxidation) होते (How To Get Rid Of Blackheads).

 

आपले नाक शरीरावरील सर्वात तेलकट भाग आहे आणि त्यामुळे ब्लॅकहेड्सचा सर्वाधिक त्रास तिथे होतो. या हट्टी ब्लॅकहेड्सचा सामना करण्यासाठी काही (How To Get Rid Of Blackheads ) घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. ब्लॅकहेड्स दूर करण्याच्या ब्यूटी ट्रीटमेंट घरच्या घरी करता येतात. ब्लॅकहेड्स दूर करण्याचे घरगुती उपाय येथे जाणून घेवूयात (How To Get Rid of Blackheads Naturally)…

 

घरच्या घरी ब्लॅकहेड्स दूर करण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Get Rid Of Blackheads)

1. ओटमील स्क्रब (Oatmeal Scrub)
ओटमील स्क्रबमुळे ब्लॅकहेड्स तर कमी होतातच पण चेहर्‍याची चमकही वाढते. ओटमीलमध्ये दही (Curd), लिंबू (Lemon) मिसळून पेस्ट तयार करा. कमीतकमी 15 मिनिटे चेहर्‍यावर ठेवा. कोमट पाण्याने चेहरा हलके धुवा.

 

2. दूध, मध आणि कापूस (Milk, Honey And Cotton)
दूध आणि मध एकत्र करून काही वेळ ठेवा किंवा हवे असल्यास मध टाकलेले दूध उकळवू शकता. थंड झाल्यावर चेहर्‍यावर लावा. त्यावर कापसाचा थर लावून ठेवा. किंवा त्यात कापूस भिजवून चेहर्‍यावर ठेवू शकता. हे मिश्रण किमान 15 मिनिटे चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

 

3. खोबरेल तेल, जोजोबा तेल आणि साखर स्क्रब (Coconut Oil, Jojoba Oil And Sugar Scrub)
ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी साखरेचा स्क्रब खूप प्रभावी ठरतो. साखर बारीक करून त्यात खोबरेल तेल किंवा जोजोबा तेल मिसळून लावा. तुमच्या त्वचेनुसार तेल निवडा आणि नंतर चेहर्‍यावर हलक्या हाताने स्क्रब करा. ब्लॅकहेड्स बर्‍याच प्रमाणात कमी होतात.

4. बेकिंग सोडा आणि पाणी (Baking Soda And Water)
बेकिंग सोडा देखील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी खूप चांगले परिणाम देतो. बेकिंग सोडा, लिंबू आणि कोमट पाणी मिसळून पेस्ट बनवा.
चेहर्‍याला ही पेस्ट लावा. काही वेळाने चेहरा धुवा. काही आठवड्यात, ब्लॅकहेड्स कमी दिसू लागतील.

 

5. दालचिनी पावडर (Cinnamon Powder)
दालचिनी पावडर ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी उत्तम स्क्रब म्हणूनही काम करते. त्यात लिंबाचे थेंब टाका.
पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावा आणि किमान 10 मिनिटे चेहर्‍यावर ठेवा.
ब्लॅकहेड्स व्यतिरिक्त, व्हाइटहेड्स (Whiteheads) देखील दूर होतील आणि त्वचा घट्ट होईल.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- How To Get Rid Of Blackheads | how to get rid of blackheads you can easily get rid of blackheads just try these effective home remedies at home

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Natural Painkiller Remedies | विना साईडइफेक्ट्स ‘पेन किलर’चं काम करतात ‘या’ 7 गोष्टी, तुम्हाला माहित आहेत का?

 

Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

 

Narayan Rane | बंगल्यावरील ‘हातोड्या’ची कारवाई टाळण्यासाठी नारायण राणेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल