सीरीयस रिलेशनशिपमध्ये असूनही दुसरं कोणी का आवडतं ? अशावेळी काय करावं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपण असे अनेक कपल पाहिले असतील जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात. याशिवाय असेही काहीजण पाहिले असतील जे आधीच नात्यात असतात तरीही त्यांच हृदय आणखी कोणासाठी धडधडू लागतं. पार्टनरव्यतिरीक्त आणखी कोणी आवडलं तर काय ? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

नात्यात असूनही दुसऱ्या व्यक्तिकडे मन आकर्षित होतं. ती व्यक्ती एवढी खास वाटू लागते की आपण कळत- नकळतपणे त्याच्यासोबत स्वतःला पाहू लागतो.

जर तुम्ही पार्टनरव्यतिरीक्त एखाद्या मित्रासोबत खूप वेळ घालवला तरी तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होऊ शकता. हे सामान्य आहे. जर असे कधी झाले तर तुम्ही सर्वात आधी ही बाब तुमच्या पार्टरनला सांगा. कारण तुम्ही सिरीयस रिलेशनशिपमध्ये असूनही दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असाल तर पार्टनरसोबत बोला. कारण हे क्षणिक आकर्षण असतं. काही काळाने ते आपोआप विरूनही जातं.

जर तुम्ही सिरिअस रिलेशनशिपमध्ये असूनही दुसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होत असाल तर सर्वातआधी तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरला सांगा. ही एक सामान्य गोष्ट आहे असं मानून पार्टनरला याबद्दल सांगा आणि त्याबद्दल मोकळेपणाने बोला. हे क्षणिक आकर्षण असतं आणि काही काळाने ते आपणहून विरून जातं.

जर तुम्हाला कोणाविषयी आकर्षण वाटलं तर पार्टनरचा विचार मनात आणा. जर तुम्ही पार्टनरच्या चांगल्या गोष्टी आठवल्या तर हे आकर्षण आपोआपच कमी होईल. अनेकदा असं होतं महिला भावनिक आधार शोधण्यासाठी इतर पुरुषाकडे आकर्षित होतात. मात्र यात अपराधी भावनाही असते. अशावेळी पार्टनरशी बोलणे हा उत्तम उपाय आहे.
जर तुमचं कोणावर क्रश आहे तर अशावेळी जुने दिवस आठवा. तुमच्या नात्यातील ते सुंदर क्षण पुन्हा आठवा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या किती आकंठ प्रेमात बुडाला होता ते क्षण आठवा.

जर तुमचं कोणावर क्रश असेल तर तुम्ही पार्टनरसोबतचे चांगले क्षण आठवू शकता. यामुळे हे दुसऱ्या प्रति वाटणारं आकर्षण आपोआपच कमी होतं.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like