डासांमुळं त्रस्त आहात ? ‘हे’ 6 सोपे घुरगुती उपाय करा ! जवळही फिरकणार नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डासांपासून सुटका मिळवण्याासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करताना दिसतात. परंतु अनेकदा यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळं काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. अशात तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) कडुलिंबाचं तेलं आणि कापूर यांचं मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीत भरा. हा स्प्रे तमालपत्रावर मारा आणि नंतर हे तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळं डास घरातून पळून जातील.

2) घराचं दार आणि खिडक्या बंद करून थोडा कापूर जाळा. थोड्या वेळानं परत उघडा. असं केल्यानं डास पळून जातील.

3) झोपताना कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा आणि त्याचा दिवा लावा. यामुळं डास जवळही फिकणार नाहीत.

4) घरासमोर असणाऱ्या तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत. डास चावल्यानंतर प्रभावित जागेवर खाज येते. अशा वेळी तुम्ही तुळशीच्या पानांचा रस लावला तर त्या ठिकाणी खाज बंद होते.

5) पुदीन्याच्या उग्र गंधामुळंही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हात-पायांना 1-2 पुदीन्याची पानं चोलावी यामुळं डास रात्रभर तुमच्याजवळ फिरकणार नाहीत.

6) लसणाच्या काही पुड्या पाण्यात टाकून चांगल्या उकळा. हे पाणी घरात शिंपडा. लसणाच्या तिखट वासामुळं डास घरात येणार नाहीत. घरातील डासही बाहेर जातील.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.