केसांना काळे करण्यासाठी ‘हे’ आहेत 3 उपाय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. या मुळे तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यासाठी 3 प्रभावी उपाय असून वापरण्यास सोपे आहेत.

1. रिठा
रिठा केसांच्या वाढीसाठी परिचित आहे. परंतु त्यातील आयुर्वेदिक गुणधर्म केस काळे करण्यासाठी प्रभावी मानला जातो. अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रिठ्यात आहेत. त्याद्वारे टाळूतील खाज कमी होण्यास मदत होते. केस मऊ होतात. रिठा कंडिशनर म्हणून काम करतो. तो पांढरे केस काढून टाकण्यास उपयुक्त मानला जातो.

२. आवळा
आवळ्याचे त्वचेपासून केसांपर्यंत बरेच आश्चर्यकारक फायदे आहेत. आवळ्यात अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते. अल्फा -5 रिडक्टेसच्या क्रियाकलापांना रोखून केसांची वाढ होण्यासाठी आवळा फायदेशीर मानला जातो. केस गळणे टाळण्यासाठी प्रभावी आहे. तो केसांची गुणवत्ता सुधारण्यास उपयुक्त मानला जातो.

३. शिकेकाई

केसांच्या बर्‍याच समस्या दूर करण्यासाठी शिकेकाई खूप प्रभावी मानली जाते. पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यासही उपयुक्त आहे. केस गळणे रोखण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. शिकेकाईचे तेल टाळूतील घाण काढून टाकण्यास मदत करते.

You might also like