How To Get Soft Lips | कोरडे आणि फाटलेले ओठ मुलायम बनवण्यासाठी ‘या’ 3 टिप्ससह करा 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Get Soft Lips | कोरडे आणि फाटलेले ओठ खराब दिसत असल्याने महिला विविध प्रकारची प्रॉडक्ट वापरतात. परंतु त्यामुळे नुकसान होऊ शकते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे ओठांमध्ये तेल ग्रंथी नसल्यामुळे ओठ सहज कोरडे (How To Get Soft Lips) होतात.

 

ओठांवरची त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा खूपच पातळ आणि नाजूक असते. ओठ सूर्य आणि थंड, कोरड्या हवेच्या संपर्कात येतात, त्यामुळे ते कोरडे पडतात, आणि क्रॅकिंग (Cracking), फ्लेकिंगची (Flaking) समस्या होते. फाटलेल्या ओठांसाठी काही औषधे देखील जबाबदार असतात. ते टाळण्याचे काही घरगुती उपाय येथे जाणून घेवूयात (How To Get Soft Lips)…

 

कोरडे आणि फाटलेल्या ओठांसाठी उपाय (How To Cure Dry And Chapped Lips)

1. लिप बाम वापरा (Use Lip Balm) :
ओठांना त्रास होणारा लिप बाम कधीही वापरू नका. तुम्हाला सूट होणारा लिप बाम (Lip Balm) निवडा आणि वापरा.

 

2. भरपूर पाणी प्या (Drink Plenty Water) :
कधी कधी तहान लागल्याने ओठ कोरडे होतात. फाटलेले ओठ टाळण्यासाठी नेहमी हायड्रेटेड (Hydrated) राहणे फार महत्वाचे आहे.

 

3. ओठ चावणे आणि चाटणे थांबवा (Stop Biting And Licking Lips) :
ओठ कोरडे झाल्यावर ते चाटणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे, परंतु यामुळे ते जास्त कोरडे होतात, कारण लवकर बाष्पीभवन होते. त्यामुळे ओठांवर सतत जीभ फिरवू नका.

ओठ मऊ ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय (Natural Remedies for Soft Lips)

1. कोरफड (Aloe vera) :
कोरफडीच्या गरात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण (Vitamins, Minerals, Antioxidants And Anti-inflammatory Properties ) असतात ते त्वचेला शांत करतात आणि हायड्रेट (Hydrate) करतात.

 

2. खोबरेल तेल (Coconut Oil) :
खोबरेल तेल जळजळ थांबवते, ते एक उत्तेजक आहे, याचा अर्थ ते त्वचेला शांत आणि मऊ करू शकते.

 

3. मध (Honey) :
मध अत्यंत मॉयश्चरायझिंग (Moisturizing) आहे, ते कोरड्या ओठांसाठी उत्तम उपचार आहे. मधामध्ये अँटिऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या (Bacteria) वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे, यामुळे कोरड्या किंवा फाटलेल्या ओठांमध्ये संक्रमण होण्यापासून रोखण्यास मदत करते.

 

4. काकडी (Cucumber) :
काकडीने ओठांना हळूवारपणे मॉयश्चराईझ करा. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी ओठांचे स्वरूप सुधारतात.

 

5. ग्रीन टी (Green Tea) :
अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे समृद्ध, ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल (Polyphenols) देखील असते, ज्यामुळे जळजळ कमी होते. ग्रीन टी ची एक पिशवी कोमट पाण्यात भिजवून ओठांवर हलक्या हाताने लावल्यास त्वचा मऊ होईल आणि अतिरिक्त कोरडी त्वचा दूर होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- How To Get Soft Lips | how to get soft lips try these tips and home remedies to soften dry and chapped lips in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Natural Painkiller Remedies | विना साईडइफेक्ट्स ‘पेन किलर’चं काम करतात ‘या’ 7 गोष्टी, तुम्हाला माहित आहेत का?

 

Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण तर चांदी तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

 

Narayan Rane | बंगल्यावरील ‘हातोड्या’ची कारवाई टाळण्यासाठी नारायण राणेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल