‘असं’ जपा ओठांचं सौंदर्य ! घ्या ‘ही’ विशेष काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ऋतु कोणताही असला तरी अनेकजण ओठांच्या समस्येनं त्रस्त असतात. अनेकांना ओठ फुटण्याचीही समस्या असते. काहींचे ओठ शुष्क म्हणजेच कोरडे असतात. आज आपण हे जाणून घेणार आहोत ओठांची काळजी कशा प्रकारे घ्यायला हवी.

1) सकाळी आणि रात्री दात घासताना ब्रश ओठांवरून अलगद फिरवावा. त्यामुळं ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

2) रात्री झोपताना व्हॅसलिन आणि लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावा त्यामुळं ओठांचा कोरडेपणा दूर होतो.

3) रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलानं ओठावर मसाज करून नंतर सुती कपड्यानं पुसून घ्या. ओठ नरम होण्यास याची खूप मदत होते.

4) ओठ दातानं कुरतडण्याची सवय टाळा. या सवयीमुळं ओठांच्या त्वचेचं नुकसान होत असतं. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खचली गेल्यानं त्यातून रक्त येतं, त्यामुळं ओठ राठ पडतात.

लिपस्टिक लावताना या गोष्टी आवर्जून करा

1) रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुवून लिप बाम किंवा तूप लावावं. यामुळं लिपस्टिकमध्ये असणाऱ्या केमिकलमुळं होणारं ओठांचं नुकसान भरून निघण्यास मदत होते.

2) लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम लावावा.

3) लिपस्टिक ओठांवर दीर्घकाळ टिकवण्यासाठी ती काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून लावावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.