लोहडी आणि मकर संक्रांत आली, जाणून घ्या या सणांचे महत्व आणि सूर्य-शनीकडून लाभ मिळवण्याचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोहडी सुद्धा उत्तर भारतातील एक प्रमुख सण आहे. हा सुद्धा सूर्याच्या मकर संक्रांतीशी संबंधीत आहे. यामध्ये सुद्धा प्रकाशाची पूजा केली जाते. या सणात लोक संध्याकाळी अग्नी पेटवून त्यामध्ये आहुती देतात. सामान्यतः अग्नीमध्ये तिळ, मका आणि रेवडी इत्यादी टाकले जाते. कुटुंबात एखाद्याचे लग्न झालेले असेल किंवा बाळाचा जन्म झालेला असेल तर हा सण आणखी विशेष होतो.

काय आहे मकर संक्रांती ?
सूर्याचे एखाद्या राशीत विशेष भ्रमण होते त्यावेळी संक्रांती होते. सूर्य एक महिन्यात राशीचे परिवर्तन करतो, यासाठी एकुण मिळून वर्षभरात बारा संक्रांती असतात, परंतु दोन संक्रांती सर्वात महत्वाच्या असतात. एक मकर संक्रांती आणि दुसरी कर्क संक्रांती. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्ह मकर संक्रांती होते. मकर संक्रांतीपासून अग्नी तत्त्वाची सुरुवात होते. यावेळी सूर्य उत्तरायण असते. यावेळी केलेले जप आणि दानाचे फळ अनंत पटीने होते. यावेळी मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी केली जाईल.

मकर संक्रांतीचा ज्योतिषशी संबंध
सूर्य आणि शनीचा संबंध या सणाशी असल्याने तो खुप महत्वाचा आहे. या सणाला सूर्य आपल्या पुत्राला भेटण्यासाठी येतो. जर जन्मकुंडलीत सूर्य किंवा शनीची स्थिती खराब असेल तर या सणाला विशेष पूजा करून ती ठिक करता येते. या सणाला स्नान, ध्यान आणि दान विशेष फलदायी असते.

सामान्यपणे मकर संक्रांतीला काय करावे ?
पहिल्या होरामध्ये स्नान करा, सूर्याला अर्ध्य द्या. श्रीमदभागवदच्या एका अध्यायाचे पठन करा, किंवा गीता पठन करा. नवे धान्य, चादर आणि तूपाचे दान करा. जेवणात नवीन धान्याची खिचडी बनवा. जेवण देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून सेवन करा.

सूर्याकडून लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?
लाल फूल आणि अक्षता टाकून सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्याचा बीज मंत्राचा जप करा. मंत्र आहे – ‘ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः‘, लाल वस्त्र, तांब्याचे भांडे तसेच गहू दान करा. संध्याकाळी अन्नाचे सेवन करू नका.

शनीकडून लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?
तीळ आणि अक्षता टाकून सूर्याला अर्ध्य द्यावे. शनी देवाच्या मंत्राचा जप करा. मंत्र आहे – ‘ॐ प्रां प्री प्रौं सः शनैश्चराय नमः‘. तूप, काळी कांबळ आणि लोखंडाचे दान करा. दिवसा अन्नाचे सेवन करू नका.