पावसाळ्यात ऊन कमी असतं, मग व्हिटॅमिन-डी मिळवायचं असेल तर ‘हे’ पदार्थ खा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  शरीराला अनेक प्रकारच्या व्हिटॅमिनची गरज असते. जसं की, ए, बी, सी, डी या व्हिटॅमिनमुळे शरीराचा विकास होतो. जर व्हिटॅमिन-डी बद्दल बोलायचं झालं तर ते कोवळ्या उन्हातून मिळतं. डॉ अनुराग शाही यांनी सांगितले, रोज 15 ते 20 मिनटं उन्हात बसल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी मिळतं. व्हिटॅमिन-डी मुळे हाडांशी संबंधित अनेक आजार नाहीसे होतात. पण पावसाळ्यात जास्त ऊन पडत नाही, मग व्हिटॅमिन-डी कसं मिळवायचं असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीमध्ये खालील उपाय सुचवता येतील.

मशरूम खाणे

मशरूम मध्ये व्हिटॅमिन-डी चे प्रमाण अधिक असते. उन्हात वाढवलेल्या मशरूम मध्ये व्हिटॅमिन-डी चे प्रमाण भरपूर असते. अधिक तर लोक ऑयस्टर आणि बटन मशरूम खाणे पसंत करतात.

रोज गाईचे दूध प्या

गाईच्या दुधात व्हिटॅमिन-डी काही प्रमाणात असते, त्यामुळे गाईचे दूध पिल्याने व्हिटॅमिन-डी ची कमी राहत नाही. ज्यांना हाडांशी संबंधित आजार आहेत ते गाईचं दूध पिल्याने बरे होतात. तसेच गाईच्या दुधात फॅट देखील कमी प्रमाणात असतात.

अंड्यामध्ये व्हिटॅमिन-डी चे प्रमाण असते

अंड्यामध्ये प्रोटीन सोबत व्हिटॅमिनही असतं. अंड्याच्या वरच्या पांढऱ्या भागात व्हिटॅमिन-डी अधिक प्रमाणात असते. ज्यांची हाडं ठिसूळ आहेत त्यांनी अंडी खाल्ली पाहिजे.

संत्री ज्युस

संत्र्याच्या ज्युसमध्ये देखील व्हिटॅमिन-डी आणि सी चे प्रमाण असते. संत्री खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते. पावसाळ्यात संत्री किंवा मोसंबी खाणे शरीराला चांगले असते.

मोड आलेले कडधान्ये खा

मोड आलेले कडधान्ये खाणे शरीरासाठी चांगले असते. त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डी मिळते.
आणि त्यात प्रोटीन देखील अधिक असते. मोड आलेले कडधान्ये दोन ते तीन दिवसांनी खाल्ले तर त्याचा फायदा होतो.

सोया मिल्क

सोया मिल्क गाईच्या दुधासारखेच असते, ते सोयाबीन पासून बनवतात. एक सोया मिल्कमध्ये 39% व्हिटॅमिन-डी चे प्रमाण असते. सोया मिल्क मध्ये प्रोटीन आणि कॅल्शिअमचे प्रमाण देखील अधिक असते. हाडांचा आजार असणाऱ्या लोकांना सोया मिल्क पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वरील पदार्थांचे सेवन करा.