Telegram मध्ये ‘या’ पध्दतीनं Hide करा आपला ‘लास्ट सीन’, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपल्या प्रायव्हेट पॉलिसीला अपडेट केल्यानंतर बरेच वापरकर्ते टेलिग्रामवर शिफ्ट झाले. गेल्या काही आठवड्यांत या क्लाउड बेस्ड मेसेजिंग अ‍ॅपला बरेच यूजर्स मिळाले. व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच युजर्सना टेलिग्राममध्ये देखील आपला ‘लास्ट सीन’ हाईड करण्याचा पर्याय मिळतो. जर आपण व्हॉट्सअ‍ॅप सोडून टेलिग्राम वापरण्यास सुरवात केली असेल तर आम्ही आपल्याला येथे सांगणार आहोत की कशा प्रकारे आपण या फीचरचा वापर करू शकता.

– आपल्या स्मार्टफोनवर टेलीग्राम अ‍ॅप उघडा.
– आता स्क्रीनच्या वरील डाव्या कोपऱ्यात असलेल्या हॅम्बर्गर मेनूवर टॅप करा.
– नंतर मेनूमध्ये दिलेल्या सेटिंग्ज पर्यायावर टॅप करा.
– आता सेटिंग्ज मेनूमधील प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पर्यायावर टॅप करा.
– यानंतर ‘लास्ट सीन’ पर्यायावर टॅप करा.

– आता आपण हे सिलेक्ट करू शकता की कोण आपला लास्ट सीन पाहू शकेल. आपण Everyone वाल्या डिफॉल्ट सेटिंगला My contacts किंवा Nobody मध्ये चेंज करू शकता. सर्वांपासून लास्ट सीन हाईड करण्यासाठी आपल्याला ‘Nobody’ सिलेक्ट करावा लागेल.

– आता आपल्याला स्क्रीनच्या उजव्या बाजूला चेक मार्कवर टॅप करावे लागेल. यानंतर एक संदेश येईल. यामध्ये असे लिहिलेले असेल की ज्या लोकांसह आपण आपला लास्ट सीन शेअर करत नाही आहात, त्यांचा लास्ट सीन आपणही पाहू शकणार नाहीत. तथापि, आपल्याला अनुमानित लास्ट सीन नक्कीच दिसेल. जसे- अलीकडेच, याच आठवड्यात किंवा याच महिन्यात.

– आता फक्त OK वर टॅप करा आणि यानंतर आपला लास्ट सीन हाईड होईल.