2000 आणि 500 ची नोट ‘खरी की खोटी’ ते ‘असं’ तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे की, बाजारात सर्वात जास्त 500 रुपयांचे बनावट चलन सुरू आहे. त्याचबरोबर 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 21.9 टक्के वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, 500 रुपयांच्या बनावट नोटांपैकी मागील वर्षाच्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षात 121 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बनावट नोटा रोखण्यासाठी सरकारने जुन्या नोटांच्या जागी नवीन नोटा आणण्याचा निर्णय घेतला. असे असूनही, बनावट चलन बाजारात पूर्णपणे नियंत्रित होऊ शकले नाही.

जाणून घ्या 2000 आणि 500 रुपयांच्या खऱ्या नोटा कशा ओळखाव्यात –

अशी ओळखा 2000 रुपयाची ची खरी नोट

– नोट प्रकाशात धरून पाहिली तर नोटेवर 2000 असे दिसून येईल.
– देवनागरी लिपीत 2000 लिहिलेले दिसेल.
– मधोमध महात्मा गांधीजींचा फोटो दिसेल.
– छोट्या अक्षरांमध्ये RBI लिहिलेले दिसेल.
– नोटेच्या सेक्युरिटी थ्रीडचा रंग बदलतो.
– गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सही, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआय लोगो उजवीकडे आहेत.
– वरच्या डाव्या बाजूस आणि सर्वात उजवीकडे लिहिलेल्या संख्या डावीकडून उजवीकडे वाढतात.
– 2000 क्रमांकाचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो.
– उजव्या बाजूला अशोकस्तंभ आहे.

अशी ओळखा 500 रुपयाची ची खरी नोट –

– नोट प्रकाशात धरून पाहिली तर नोटेवर 500 असे दिसून येईल.
– डोळ्यांच्या बरोबर 45 डिग्री समोर नोट धरली की त्यावर 500 लिहिलेले दिसेल.
– देवनागरी लिपीत 500 लिहिलेले दिसेल.
– नोटेला हलके हलवल्यावर सुरक्षेच्या धाग्याचा रंग हिरवा व निळा होतो.
– जुन्या नोटेच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सही, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआय लोगो उजवीकडे सरकला आहे.
– महात्मा गांधींचे चित्र आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्कही नोटेवर आहे.
– वरच्या डाव्या बाजूस आणि खाली उजवीकडे सर्वात वर लिहिलेले क्रमांक डावीकडून उजवीकडे वाढतात.
– नोटेवर लिहिलेल्या 500 नंबरचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरवा व निळा होतो.

आरोग्यविषयक वृत्त –