जंक फूडमुळे शारीरीक, मानसिक आरोग्य धोक्यात

पुणे : पोलासनामा ऑनलाईन – सध्या जंक फूड खाणे हे स्टेटस सीम्बॉल झाले आहे. लहान असोत की मोठे सर्वचजण जंक फूडवर ताव मारताना आपण पाहतो. शिवाय, शहरी भागात ठिकठिकाणी जंड फूड उपलब्ध असल्याने अनेकजण त्याच्या आहारी गेल्याचे दिसते. या सवयीमुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. शिवाय मोठ्यांनाही याचे दुष्परिणाम भोगावे लागातात.

जंक फूडचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक मुलं लठ्ठपणासारख्या आजारांचा सामना करत आहेत. जंक फूडमुळे अनेक घातक आजार होण्याचाही धोका असतो. अनेक पालकांची इच्छा असते की, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवावं, पण मुलांच्या हट्टासमोर त्यांचे काहीही चालत नाही.

पिझ्झा, बर्गर, पॅकेज्ड चिप्स, कोल्डड्रिंक्स, चॉकलेट्स, आइसक्रिम्स, पेस्ट्री, नुडल्स, टॉमेटो केचअप इत्यादी पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो. ते हेल्दी असण्याचा जावा केला जातो. त्यांच्यामध्ये फरक करणं थोडं कठिण असतं. उदाहर्णार्थ, असे ज्यूस जे टेट्रापॅक आणि पावडर स्वरूपात असतात. बिस्किट्स अगदी तेही जे फायबरयुक्त असण्याचा दावा करतात त्यांचाही समावेश जंक फूडमध्ये होतो. डार्क चॉकलेट, चॉकलेट सिरप, केक आणि मफिन्स, रेडी टू कूक, एनर्जी ड्रिंक, बेक्ड किंवा मल्टीग्रेन चिप्स, जॅम, न्यूडल्स, फ्लेवर्ड दही आणि दूध यांचाही समावेश जंक फूडमध्ये होतो.

महिन्यामध्ये ८ वेळा जंक फूड खात असाल तर पुढिल महिन्यात ४ वेळाच खा. म्हणजे प्रत्येक महिन्यात ५० टक्क्यांनी कमी करा. तिसऱ्या महिन्यामध्ये २ वेळाच खा आणि चौथ्या महिन्यामध्ये एकदाच खा आणि ५व्या महिन्यामध्ये जंक फूड खाणं सोडून द्या, अशा पद्धतीने जंक फूडचे व्यसन तुम्हाला घालवता येऊ शकते. मुलांची जंक फूडची सवय सोडवण्यासाठी पालकांनीही काळजी घेतली पाहिजे. पारंपारिक पद्धतीचे अनेक चविष्ट पदार्थ आपल्याकडे बनविले जातात. काळाच्या ओघात आपण ते विसरून गेलो आहोत. मुलांना अशा पदार्थांची गोडी लावल्यास ते जंक फूड विसरून जातील.