Improve Brain Power | मुलांची बुद्धी वाढवण्याचे उपाय ! मुलांची ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी पालकांनी करावीत ‘ही’ 6 कामे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी (improve brain power) पालक अनेक प्रयत्न करत असतात. मात्र त्यांना केवळ चांगला आहार (Diet) आणि इतर गरजा पूर्ण करून नव्हे, तर आपल्या मुलांना भरपूर वेळ देत काही विशेष कामे करणे गरजेचे आहे. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात. how to improve brain power of kids home remedies and easy tips to improve memory power of kids

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

मुलांना विचारा हे प्रश्न

जर तुम्ही मुलांसोबत बाहेर गेलात, एखादा चित्रपट पाहिला किंवा ट्रिपला गेलात तर घरी आल्यानंतर मुलांना त्या चित्रपटाबद्दल, ठिकाणाबद्दल प्रश्न विचारा.
ठिकाण कसे होते? तिथे काय-काय पाहिले? चित्रपटात कोण कोण होते? इंटरव्हलला आपण काय खाल्ले? असे प्रश्न विचारल्याने संपूर्ण दिवसाच्या आठवणीमुळे मुले मेंदूवर जोर देतील आणि मेंदूच्या पेशी वेगाने काम करतील.

शब्दांचे खेळ खेळा

एका पेपरवर इंग्रजीचे काही अल्फाबेट लिहा आणि मुलांना सांगा
यापैकी ते अल्फाबेट काढून टाका जे वोवेल्स नाहीत. अशाप्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीने ते लवकर वोवेल्स शिकतील.

नंबर गेम्स सुद्धा खेळा

मुलांसमोर दिवसात अनेकदा अशा संख्या बोला ज्यामध्ये त्यांच्या अभ्यासातील संख्यांचा वापर असेल
ज्या त्यांना लक्षात ठेवायच्या आहेत. अशाप्रकारे त्यांना त्या संख्या लक्षात राहतील.

घरातील कामे करायला सांगा

मुलांना अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि मेंदू तल्लख ठेवण्यासाठी घरातील कामे करायला सांगा.
त्यांना स्वयंपाक घरातील कामात सहभागी करू घ्या. तुम्ही जे बनवत आहात त्यामधील महत्वाच्या गोष्टी द्यायला सांगा. या गोष्टी ते लक्षात ठेवतील. घरातील खेळणी, सामान जागच्या जागी ठेवायला सांगा.
म्हणजे ते कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे हे लक्षात ठेवतील.

आहाराची काळजी घ्या

मुलांना रोज एकसारखे जेवण देऊ नका. त्यामध्ये बदल करा. त्यांन फळे, हिरव्या भाज्या
आणि प्रोटीनयुक्त अन्न द्या. तसेच सुकामेवा आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ द्या.

Web Title : how to improve brain power of kids home remedies and easy tips to improve memory power of kids

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Mumbai Local Train | मुंबईची लोकल सुरु होण्याचे संकेत?, Local पावसाळी अधिवेशनानंतर धावण्याची शक्यता