जाणून घ्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप वाढविण्याची सोपी पध्दत, थर्ड पार्टी अ‍ॅपची नाही गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या विविध कंपन्या स्मार्टफोनची निर्मिती करत आहे. पण बहुतांश स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप कमी असतो. त्यामुळे पॉवर बँक घेऊन मोबाईल वापरावा लागतो. मात्र, ही एक सामान्य बाब झाली आहे. पण अशा काही गोष्टी आहेत त्यावर लक्ष दिल्यास बॅटरी वाचू शकते आणि याचा फायदाही होऊ शकतो. यातील विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ऍपचा आधार घ्यावा लागणार नाही.

बॅटरी वाचवण्याचे असे काही पर्याय आहेत ते तुमच्या फोनमध्येच आहेत. त्याचीच माहिती घेणार आहोत.

पॉवर सेव्हिंग मोड
स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे पॉवर सेव्हिंग मोड पर्याय असतात. त्यानुसार, लो, मीडियम आणि हाय पॉवर सेव्हिंग मोड सिलेक्ट करू शकता. CPU, Always On Display यांसारख्या बॅटरी वापरणाऱ्या फीचरवर रेस्ट्रिक्शन येते. त्यामुळे बॅटरी बॅकअप वाढतो.

WiFi चा करा वापर
जितकं शक्य आहे तेवढा WiFi चा वापर करावा. मोबाईल डाटा जास्त बॅटरी युज करतो. यामुळे तुम्हाला कमी बॅटरी बॅकअप मिळतो. जर तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही Mobile Data ऐवजी Wifi वापरण्याचा प्रयत्न करा.

Location, Bluetooth, NFC करा बंद
तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन, NFC आणि ब्लूटूथ बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा याचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा. काम झाल्यानंतर ते बंद करावे. हे सर्व On असल्यास मोठ्या प्रमाणात बॅटरीचा वापर होतो.

Vibration स्ट्रेंथ करा कमी
मोबाईल फोनवर येणाऱ्या कॉल आणि नोटिफिकेशनने फोन व्हायब्रेटही करतो. त्यामुळे बॅटरीचा जास्त वापर होतो. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन फोन व्हायब्रेशनची स्ट्रेंथ कमी करावी. असे केल्यास बॅटरीचा वापर कमी होऊ शकतो.

फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर ठेऊ नका
स्मार्टफोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर ठेवण्याचा पर्याय मिळतो. हा वॉलपेपर सेट केल्याने स्मार्टफोनची बॅटरी जास्त वापरली जाते. त्यामुळे बॅटरी बॅकअपवर याचा परिणाम होतो. जर तुम्ही असा लाईव्ह वॉलपेपर ठेवला असेल तर तो काढून टाकावा.

डार्क मोड करा ऑन
जर तुमच्या फोनमध्ये OLED किंवा AMOLED डिस्प्ले असेल तर डार्क मोड ऑन करून फोनचा बॅटरी बॅकअप वाढवू शकता. तसेच OLED किंवा AMOLED डिस्प्लेमध्ये डार्क मोडमध्ये ब्लॅक दिसणारा पिक्सल बंद केला जातो. त्याने बॅटरी वाचते.