‘या’ सोप्या पध्दतीने तुमच्या फोनमध्ये मिळवा अनलिमिटेड ‘स्पेस’, जाणून घ्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – आपला फोन अनेकदा स्लो होतो. फोन जुना झाल्यानंतर या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवतात. त्याचबरोबर अनेकदा आपली महत्वाची कामे सुरु असताना आपल्याला हि समस्या प्रकर्षाने जाणवते. फोन अचानकपणे हँग होऊन बंद देखील पडतो. त्याचबरोबर आपण अनेक ऍप देखील मोठ्या प्रमाणावर वापरत असतो. त्याचबरोबर मोबाईलला अंत्यंत चांगला कॅमेरा येत असल्याने आपण फोटोदेखील मोठ्या प्रमाणावर काढत असतो. त्यामुळे आपल्या फोनची मेमरी मोठ्या प्रमाणात भरते. त्यामुळे तुमचा फोन स्लो होतो.

त्याचबरोबर आपल्या फोनमधील मेमरीमुळे आपला मोबाईल हँग देखील होतो. त्याचबरोबर फोटो आणि व्हिडीओ डिलीट करून देखील कधीकधी तुमच्या फोनमध्ये जागा होत नाही अशा वेळी आम्ही तुम्हाला एक आयडिया सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमच्या फोनची मेमरी वाढवू शकता.

या पद्धतीने मिळवा जास्त मेमरी

१) तुमच्या फोनमधील बॅकअप मोड या पर्यायावर जाऊन हाय क्वालिटी पर्याय निवडा.
२) गुगल फोटो अॅप उघडा.
३) या अॅपच्या वर असणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
४) त्यातील सेटिंग या पर्यायावर जा.
५) त्यानंतर Backup mode या  पर्यायावर जाऊन  High quality या पर्यायावर क्लिक कर.
६) त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे  Back up device folders मध्ये जाऊन तुम्हाला ज्या ठिकाणी बॅकअप घ्यायचा आहे त्यावर क्लिक करा.

त्याचबरोबर गुगल फोटोचे अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलचा बॅकअप या ठिकाणी घेऊन मेमरी मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.

आरोग्यविषयक वृत्त