‘या’ टिप्स वापरून वाढवू शकता ‘वायफाय स्पीड’ (Wifi Speed)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आजकाल इंटरनेट शिवाय आपली सर्वच कामे अडतात. मोबाईल डाटा किंवा वायफाय चा वापर आपण इंटरनेटसाठी करतो. काहीवेळा मात्र एखादं महत्त्वाचं काम करताना किंवा व्हिडीओ बघताना अचानक कनेक्शन एरर येतो किंवा नेट स्लो चालल्यामुळे काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. अशावेळी काय करावे हे लक्षात न आल्यामुळे आपण वैतागतो. मात्र काही सध्या सोप्या उपाययोजना वापरून आपण वायफायचा वेग वाढवू शकतो. खालील टिप्स वापरल्याने तुमचे वायफाय होईल वेगवान-

१. ‘स्मार्ट अ‍ॅप्स’ चा वापर :
‘क्लाऊड चेक’ सारख्या अ‍ॅप चा वापर केल्यास तुम्हाला घरी कोणत्या कोपऱ्यात वायफायचा वेग कमी आहे किंवा कुठे वेग जास्त आहे याची अचूक माहिती मिळू शकते. हे अ‍ॅप तुम्हाला एखाद्या ठिकाणी असणारी ‘सिग्नल स्ट्रेंथ’ दाखविण्याचे काम करते. यांच्या साहाय्याने वेगवान सिग्नल असणारी जागा तुम्ही शोधू शकता.

२. राऊटर ठेवा मोकळ्या जागेत:
इतर उपकरणांचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी वायफाय साठीचा राऊटर मोकळ्या जागेत आणि मायक्रोवेव्ह, कॉर्डलेस फोन यांसारख्या लहरी प्रसारित करणाऱ्या उपकरणांपासून दूर ठेवायला हवा. बऱ्याचदा मजले, छत, भिंत आणि इतर अडथळे येतात. वायफाय सिग्नल्सना या अडथळ्यांपासून वाचवून त्याचा वेग आपण वाढवू शकता.

३. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :
तुमच्या वायरलेस नेटवर्कच्या वेगात वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि हार्डवेअरचा वापर तुम्ही करू शकता. Wireless-N (802.11n) सारख्या काही नव्या आणि वेगवान टेक्नॉलॉजी आहेत ज्या अत्यंत वेगवान आहेत

४. राऊटरच्या चॅनेलमध्ये बदल:
एकाच चॅनलवर बरीचशी उपकरणं कनेक्टेड असल्यास त्यामुळे राऊटरवर ताण येऊन त्याचा परिणाम वेगावर होऊ शकतो. कारण बरेचसे राऊटर एखाद्याच चॅनलवर काम करत असतात. उदा, चॅनेल ६ सर्वाधिक वापरला जातो.वायफाय स्कॅनर सारख्या गोष्टीच्या माध्यमातून जास्त बँडविथ असलेली राऊटर चॅनल्स तुम्ही शोधू शकता ज्याच्या साहाय्याने तुमच्या इंटरनेटचा वेग वाढवू शकतो. चॅनेल बदलणे हि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे मात्र असे केल्याने वायफाय चा वेग वाढेल.

५. योग्य आणि आधुनिक राऊटरची निवड:
नवीन आणि आधुनिक पद्धतीचा राऊटर २.४ गिगाहर्ट्झ आणि ५ गिगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीजमध्ये स्विच करण्यास सक्षम असतो. हि गोष्ट तुमच्या वायफायच्या वेगासाठी उत्तम आहे. अशा प्रकारे ऑटोमॅटिक पद्धतीने स्विच करता येणारा राऊटर जवळपास ४४ चॅनल्समधून चॅनल्सची निवड करतो. त्यामुळे वायफायचा वेग सुधारण्यास मदत होते. तयामुळे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम वायफाय वेगाचा जास्तीतजास्त लाभ घेता येतो.

६. वापरावयाच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम निश्चित करा :
राऊटरमधील QoS (क्वालिटी ऑफ सर्विस) या सुविधेचा वापर करून तुम्हाला तुमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम निश्चित करता येईल. त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमासाठी जास्तीचा वेग मिळेल. नवीन प्रकारच्या काही राऊटर्समध्ये ही सुविधा असते. वापरकर्त्यांची संख्या देखिळ वेगावर परिणाम करते.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग