तुमचा कॉल ‘रेकॉर्ड’ केला जातोय ? असं ‘चेक’ करा अन् ‘सेफ’ रहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्या परवानगी शिवाय तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे हे तुम्हाला कळाले तर तुम्हाला ते सहन होणार नाही. परंतू हे सर्व कोण करत हे तुम्हा माहित नसते. भारतासह अनेक देशात कॉल रेकॉर्ड करण्याला परवानगी नाही. तसेच ते कायदेशीर देखील नाही.

परंतू सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की आपल्या हे कळणार तरी कसे की आपला कॉल रेकॉर्ड केला जात आहे. तुम्ही हे जाणून घेऊ शकतात की तुमचे कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही, परंतू ते अशा स्थितीत शक्य नाही जेव्हा एखाद्या सरकारी कंपनीकडून तुमचे कॉल रेकॉर्ड होत असेल. सरकारी कंपन्या शक्यतो टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करतात. परंतू अशा वेळी तुम्ही जाणून घेऊ शकत नाही की तुमचे कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही. परंतू कॉल रेकॉर्डींग संबंधित तुम्ही काही बाबी जाणून घेऊ शकतात.

लक्षपूर्वक ऐका –
एक महत्वाचा रुल हा आहे की जर तुमच्याकडे एखादा कॉल येतो किंवा तुम्ही एखादा कॉल करतात तेव्हा काही सेकंदाने किंवा मिनिटांनी एक बीपचा आवाज ऐकायला येतो. असे झाले तर समजून घ्या की तुमचा कॉल कोणीतरी रेकॉर्ड करत आहे.

फोन ओवरहिटिंग –
ही एक सामान्य समस्या आहे. परंतू ही समस्या सतत येत असेल तर तुम्ही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण अशा प्रकारे देखील कॉल रेकॉर्डिंग केली जाते. तुमच्या फोनमध्ये असे काही सॉफ्टवेअर असते जे कॉल रेकॉर्डिंग काही दुसऱ्या ठिकाणी पाठवते किंवा सतत कॉल रेकॉर्डिंग केल्याने फोन गरम होतो.

जास्त इंटरनेट वापरले जात असेल तर दुर्लक्ष करणे –
जर तुम्हाला वाटते की आपण इंटरनेट डाटा जास्त वापरत नाही मग डाटा लवकर संपतो कसा तर सावध व्हा, काही वेळा आपला डाटा यूज चेक करत जा. यामुळे लक्षात येते की तुमचा डाटा कुठे वापरला जात आहे. कारण रेकॉर्डिंग फाईलला रिमोट सर्वरवर सेंड केले जाते.

आवश्यक नसलेले अ‍ॅप, जाहिराती आणि मेसेज –
जर तुमच्या स्मार्टफोनवर लिमिडेट अ‍ॅप असतील, तसेच जाहिराती असलेले अ‍ॅप नाहीत किंवा किंवा आपल्या फोनवर पॉप अप अ‍ॅड किंवा मेसेज येत असेल तर त्याचे एक कारण असू शकते की तुमचा फोन स्पाय होत आहे.

फोन वापरता नसताना अ‍ॅक्टव्हिटी –
जर फोन वापरात नसेल, नोटिफिकेशन नसेल तरीही स्क्रीन ऑन होत असेल. किंवा सायलेंट मोड आपोआप ऑफ होणे, किंवा फ्रंट कॅमेरा अचानक सुरु होणे. म्हणजेच कदाचित तुमचा फोन स्पाय होत आहे.

माइक आयकॉन –
स्मार्टफोनच्या सर्वात वर पॅनलमध्ये जर काही कारणाने माइकचे आयकॉन दिसत नसतील तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

शट डाऊन होण्यास जास्त वेळ –
फोन शट डाऊन करतात तेव्हा ही प्रोसेस कंपलिट होते जेव्हा सर्व बॅकग्राऊंट प्रोसेस संपते. जर कॉल रेकॉर्डिंग किंवा स्पाय अ‍ॅप मोबाइलमध्ये असेल तर शट डाऊन होण्यास थोडा जास्त कालावधी लागतो.

काहीतरी वेगळेच टेक्स्ट मेसेज –
जर असे मेसेज फोन मध्ये येत असतील जे तुम्हाला समजत नसतील. ज्यात वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आणि सिंबॉल्स असू शकतात. या प्रकारच्या मेसेजने देखील तुम्ही सावध होऊ शकतात.

जर तुम्हाला वाटते की तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशा काही बाबी घडताना दिसत आहेत तर फोनचा बॅकअप घ्या आणि फॅक्ट्री रिसेट करा.

Visit : Policenama.com