‘WhatsApp’ वर तुम्हाला कोणी ‘ब्लॉक’ केलं, असं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅप सर्वांमध्ये खूप लोकप्रीय आहे. यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे फीचर्स मिळतात त्याप्रमाणे तुमची प्रायव्हसी ठेवण्यासाठी तुम्ही काही नंबर ब्लॉक देखील करू शकता. परंतु जर तुम्हाला हे माहिती करून घ्यायचे असेल की तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे. तर यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. हे समजून घेणं खूप अवघड आहे की नेमकं तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे परंतु तुम्ही काही गोष्टींद्वारे ते माहिती करून घेऊ शकता.

युजरचे ऑनलाइन न दिसणे
एखादा युजर जर ऑनलाइन असून तुम्हाला दिसत नसेल तर समजून घ्या त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. अशा व्यक्तीचा केवळ लास्ट सिन तुम्हाला दिसेल. जर त्या व्यक्तीने लास्ट सिन हाईड केला असेल तर तुम्ही त्याच्या नावाखाली पाहू शकता तो जर ऑनलाइन असून तुम्हाला दिसत नसेल तर समजून जा की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले आहे.

प्रोफाइल फोटो न दिसणे
वॉट्सअ‍ॅप वर जर एखाद्याचा प्रोफाइल फोटो तुम्हाला दिसत नसेल तर समजून घ्या तुम्हाला त्या युजरने ब्लॉक केलेले आहे. अनेकदा काही युजर्स आपला प्रोफाइल फोटोच लावत नाहीत अशा वेळेस दुसऱ्या एखाद्या नंबर वरून तपासून पहा जर दुसऱ्या नंबरवरून तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो दिसत असेल तर तुम्ही समजून घ्या की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.

मेसेज पाठवल्यानंतर सिंगल चेक मार्क
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज केला आहे परंतु तो त्याला डिलिव्हरच होत नाही अशा वेळेस स्क्रिनवर केवळ सिंगल टिक दिसते. असे जर वारंवार होत असेल तुमचा मेसेज त्या पर्यंत पोहचला नसेल तर समजून घ्या त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले आहे.

कॉल लावून तपासून पहा
जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्या वॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून तपासून पाहू शकता.तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला रिंग वाजतेही परंतु त्याच्याकडे कॉल पोहचत नाही अशा वेळेस समजून घ्या की तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे.

Visit : Policenama.com